Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेनचा 91 मिनिटांच्या लढतीत पराभव करून आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आठव्या मानांकित भारतीयाने 20-22, 22-20, 21-18 असा विजय मिळवून जागतिक क्रमवारीत 26… Continue reading Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

बारामतीकरांच्या मनातही फक्त मोदीच- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सध्या भाजपचे घर चलो अभियान सुरु आहे. आज बारामती लोकसभा मदारसंघात हा प्रवास सुरु आहे. दरम्यान बावनकुळे तसेच चंद्रकांत पाटील यांनी आज धायरी येथील नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांचा… Continue reading बारामतीकरांच्या मनातही फक्त मोदीच- मंत्री चंद्रकांत पाटील

23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शासनाचा कोणताही विभाग असो कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने गतिमान व्हावे, सामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयाचे उंबरे झीजवायला लावू नका, जनता सोशिक असते म्हणून जनतेला त्रास देऊ नका अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ… Continue reading 23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

बिद्री ( प्रतिनिधी ) पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचा निवडणूक कार्यक्रम आज गुरुवार दि. 12 आक्टोंबर रोजी जाहीर झाला आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या 25… Continue reading भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे. तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत… Continue reading ‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

थोरल्या पवारांचा वर्मी घाव; अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच राहणार

मुंबई ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप प्रणित राज्य सरकारशी हातमिळवणी केली. आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार या दोन गटातील वितुष्ट वाढत गेलं. यानंतर दोन्ही गटात आरोप – प्रत्योरोपाच्या फैरी सुरु झाल्या. यापार्श्वभूमीवर आता थोरल्या पवारांनी वर्मी घाव घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद… Continue reading थोरल्या पवारांचा वर्मी घाव; अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच राहणार

अखेर ‘भोगावती’चं बिगुल वाजलं…! 20 नोव्हेंबरला ठरणार गुलाल कोणाचा ?

भोगावती (प्रतिनिधी) – पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम बुधवार दि. 25 आक्टोंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. प्रशासनाने पावसाचं कारण देत हा निवडणूक कार्यक्रम काही वेळ स्थगित केला होता. यानंतर आता निवडणूक लागली असून, संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 जून रोजी छाननी… Continue reading अखेर ‘भोगावती’चं बिगुल वाजलं…! 20 नोव्हेंबरला ठरणार गुलाल कोणाचा ?

मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा जंगी सभेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे या सभेचे आयोजन केलं असून, तब्बल दोनशेहून अधिक एकरांवर या जंगी… Continue reading मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना कहर केला आहे. गाझामधून सीमा ओलांडण्यासाठी हमासने पॅराग्लायडरचाही सहारा घेतला. या दहशतवाद्यांनी जमिनीवर उतरण्यापूर्वी आकाशातून गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी पॅराग्लायडरचा वापर करून मोठ्या उंचीवर सीमा ओलांडली ज्यामुळे इस्रायली सैनिक त्यांना पाहू शकले नाहीत. हल्ला करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर आला आहे. ज्यात हमासचे दहशतवादी पॅराशूट घेऊन… Continue reading हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

error: Content is protected !!