मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे.

तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते. त्यामुळे प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा हा निव्वळ विश्वासघात आहे.

यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिसांच्या कंत्राटी भरतीवरून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका असे म्हणत सरकारला सुनावले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील कंत्राटीच करा..!

यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील कंत्राटीच करा असा टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळांचं खाजगीकरणाचा घाट या सरकारने घातला आहे. यानंतर आता पोलीस कंत्राटी भरती पद्धतीने करण्याच्या निर्णयावर शेट्टी यांनी सरकारला फटकारलं आहे. त्यामुळे यावर सरकार नरमाईची भुमिका घेणार का ? हे पहावं लागणार आहे.