मालोजीराजे शाहू छत्रपती यांचा अर्ज छाननीत बाद; मात्र***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. याच्यामध्ये मालोजीरोज शाहू छत्रपती, इंडियन नॅशनल काँग्रेस यांचे नामनिर्देशनपत्रं अवैध ठरविण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading मालोजीराजे शाहू छत्रपती यांचा अर्ज छाननीत बाद; मात्र***

कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दालन,… Continue reading कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 7 मे रोजी 47- कोल्हापूर व 48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले… Continue reading कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनाविण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे… Continue reading मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 37 अंशावर गेला असल्याने घामाने आणि उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारीही दिवसभर ऊन जोरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास… Continue reading टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप… Continue reading लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

सांगली ( प्रतिनिधी ) हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये रयत क्रांती संघटनेकडून शिराळा विधानसभा मतदार संघाचा मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. त्यासाठी सर्वांनीच योगदान… Continue reading महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

कागल ( प्रतिनिधी ) आज बुधवार दि. 17 म्हणजेच प्रभू श्री. रामनवमी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्री. रामचंद्रांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. खर्डेकर चौकातील प्रभू श्री. राममंदिरात मोठ्या उत्साहात ही आरती झाली. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, प्रभू श्री. रामनवमी म्हणजे… Continue reading पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

error: Content is protected !!