उद्या 25 कोटी कर्मचारी देशव्यापी संपावर..?

मुंबई (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या देशव्यापी संपाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या संपात नेमक्या कोणत्या सुविधा प्रभावित होणार आहेत हा प्रश्न सध्या सामान्य वर्गातून व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलैरोजी देशात बँकिंग, कोळसा खाण, महामार्ग विभाग, बांधकाम क्षेत्रासह इतरही काही क्षेत्रातील जवळपास 25 कोटी कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती मिळालीय. देशातील… Continue reading उद्या 25 कोटी कर्मचारी देशव्यापी संपावर..?

वाहनधारकांसाठी मंत्री नितीन गडकरींची नवीन घोषणा…

मुंबई (प्रतिनिधी) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवीन घोषणा केलीय. आता फास्ट टॅगशी जोडलेला एक नवीन वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी असून तो 15 ऑगस्टपासून लागू होणाराय. याचा लोकांना फायदा होणार असून टोल प्लाझावरील त्रास कमी करणे हा या वार्षिक पासचा उद्देश आहे.… Continue reading वाहनधारकांसाठी मंत्री नितीन गडकरींची नवीन घोषणा…

‘एवढं बेभान वागणं बरं नाही’, हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल

पुणे : पुण्यात कुंडमळा पर्यटनस्थळावर रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक- लेखक हेमंत ढोमेनेही यावर प्रतिक्रिया दिली. हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ” इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी… Continue reading ‘एवढं बेभान वागणं बरं नाही’, हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल

‘एमपीएससी’ अन् ‘महाजनको’ परीक्षा एकाच दिवशी..!

पुणे ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आणि महाजनको (महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादित या दोन्ही विभागाच्या भरती परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. दोन्ही विभागाच्या परीक्षा 29 जूनलाच असल्याने नेमकी कोणत्या परीक्षेसाठी जावे, या संभ्रमात विद्यार्थी आहेत. महाजनको परीक्षेसाठी एमपीएससी गट ब मुख्य… Continue reading ‘एमपीएससी’ अन् ‘महाजनको’ परीक्षा एकाच दिवशी..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फूटीवर शरचंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत…

पुणे ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट झाले. या राजकीय घडामोडीत मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे राहिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पक्षात फूट पडली. आमच्या पक्षात फूट पडेल, असे कधीच वाटले नव्हते. काही… Continue reading राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फूटीवर शरचंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत…

महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकारच्या… Continue reading महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

गोकुळच्या दूध दरात वाढ…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गोकुळने दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, याचा ग्राहकांना फटका बसणार आहे. ग्राहकांना लिटरला आता दोन रुपये जादा मोजावे लागणार आहेत. पुणे, मुंबईत म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपये तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रतिलिटर असणार आहे. काही दिवसांपूर्वी म्हैस आणि… Continue reading गोकुळच्या दूध दरात वाढ…

छत्रपती शिवाजी महाराज अन् राष्ट्र पुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही : मुख्यमंत्री फडणवीस

रायगड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याबाबत काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. आता शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरुन शनिवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा… Continue reading छत्रपती शिवाजी महाराज अन् राष्ट्र पुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आ. सतेज पाटीलांची पुणे जिल्ह्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी त्यांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुण्यासाठी निरीक्षकपदी पाटील… Continue reading आ. सतेज पाटीलांची पुणे जिल्ह्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती..!

पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी

पुणे : महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. मात्र वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू असून गेल्या… Continue reading पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी

error: Content is protected !!