पृथ्वीराज मोहोळने पटकावला महाराष्ट्र केसरीचा बहुमान..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आहिल्यानगर येथे सुरु असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अवघ्या 1 मिनिटातचं पृथ्वीराज माहोळने शिवराज राक्षे याच्यावर चितपट मात करत किताब पटकावला. मात्र, हा निकाल अमान्य करत राक्षे आणि त्याच्या समर्थकांनी थेट मैदानातच पंचाना जाब विचारत धक्काबुक्की केली. ही स्पर्धा मॅटवर घेण्यात आली. या दरम्यान, मुख्य पंचांची कॉलर ओढण्याचाही… Continue reading पृथ्वीराज मोहोळने पटकावला महाराष्ट्र केसरीचा बहुमान..!

डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचे उद्घाटन क्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्रोजेक्ट हेड व स्पर्धा संयोजक सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते. डॉ.संजय… Continue reading डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

कोल्हापूरच्या पूजा दानोळेची सुवर्ण भरारी..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला. डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा… Continue reading कोल्हापूरच्या पूजा दानोळेची सुवर्ण भरारी..!

महिला वर्ल्डकप खो-खोपटू वैष्णवी पोवारचे मंत्री हसन मुश्रीफांनी केले अभिनंदन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत भारतीय संघात कागल तालुक्यातील करंजीवने गावची कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी झालेल्या स्पर्धेत हा वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या जागतिक पातळीवरील यशाबद्दल वैष्णवी पोवार हिचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. वैष्णवीचे… Continue reading महिला वर्ल्डकप खो-खोपटू वैष्णवी पोवारचे मंत्री हसन मुश्रीफांनी केले अभिनंदन…

आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने कोरगावकर लॉन्स, टाकाळा कोल्हापूर येथे आंतरभारती शिक्षण मंडळ आणि अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या दहा वर्षाखालील गटात अग्रमानांकित शांतिनिकेतन स्कूलच्या दिविज कात्रुटने सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर पी आर मुंडरगी इंग्लिश… Continue reading आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

सिद्धार्थ कुरणेचे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील इलेक्ट्रीकल विभागाचा व्दितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी सिद्धार्थ राजेंद्र कुरणे याने राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश मिळवलय. औंध, सातारा येथे श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब यांनी आयोजित केलेल्या बाळराजे श्री २०२५ या स्पर्धेमध्ये ७५ किलो वजनगटामध्ये त्याने उत्कृष्ठ कामगिरी करत चतुर्थ क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार… Continue reading सिद्धार्थ कुरणेचे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश…

टोप येथे पर्जन्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मयूर पाटील फायटर्सने पटाकावले विजेतेपद…

टोप (प्रतिनिधी) : टोप येथे पर्जन्य प्रीमियर लीग २०२५ या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात चौगुले वॉरियर्सवर विजय मिळवत मयूर पाटील फायटर्सने विजेतेपद पटकावले. तर चौगुले वॉरियर्स उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण नऊ संघ सहभागी झाले होते. साखळी सामन्यातून विजयी होवून हे दोन्ही संघ अंतिम सामान्यांपर्यंत पोचले होते. अंतिम सामना मयूर पाटील फायटर्… Continue reading टोप येथे पर्जन्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मयूर पाटील फायटर्सने पटाकावले विजेतेपद…

नवी मुंबई येथे ‘तु चाल पुढे’ या वॉकथॉनचे भव्य आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी दिघा-ऐरोली, नवी मुंबई येथे ELDERTH6N 2025 ‘तु चाल पुढे’ या वॉकथॉन (चालण्याच्या स्पर्धा) चे भव्य आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. व्यायाम, आरोग्याविषयी जागृती आणि परस्पर संवाद यांचा सुरेख संगम म्हणजेच… Continue reading नवी मुंबई येथे ‘तु चाल पुढे’ या वॉकथॉनचे भव्य आयोजन

डी गुकेश, मनू भाकरसह ‘या’ खेळाडुंना मिळाला खेलरत्न पुरस्कार…

दिल्ली : राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना 25 लाख रुपये… Continue reading डी गुकेश, मनू भाकरसह ‘या’ खेळाडुंना मिळाला खेलरत्न पुरस्कार…

असंडोली येथे शुटिंग बॉल स्पर्धेत धरणगुत्ती संघ प्रथम…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथे भगतसिंग तरुण मंडळ आणि छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा मर्यादित शुटिंग बॉल स्पर्धेत धरणगुत्ती संघ विजेता ठरला. तर द्वितीय जयहिंद मंडळ इचलकरंजी आणि तृतीय केर्ले शूटिंग क्लब ठरला.तसेच चौथा कळे शुटिंग बॉल क्लब, पाचवा बाजारभोगाव शूटिंग बॉल क्लब, सहावा शेळेवाडी शूटिंग बॉल क्लब,… Continue reading असंडोली येथे शुटिंग बॉल स्पर्धेत धरणगुत्ती संघ प्रथम…

error: Content is protected !!