भोगावती (प्रतिनिधी) – पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम बुधवार दि. 25 आक्टोंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. प्रशासनाने पावसाचं कारण देत हा निवडणूक कार्यक्रम काही वेळ स्थगित केला होता. यानंतर आता निवडणूक लागली असून, संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार 29 जून रोजी छाननी होणार होती. मात्र शासनाने राज्यातील सर्वच निवडणूका 30 सप्टेंबर पर्यंत स्थगित केल्या होत्या. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी गुरुवारी दि. 12 तो जी भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे भोगावती साखर कारखाना परिसरात राजकिय हलचाली गतिमान झाल्या आहेत.


राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी आज गुरुवारी दि.12 रोजी भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून nसुधारित निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणें छाननी दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तसेच माघार घेण्यासाठी दि. 26 आक्टोंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत कालावधी असून, उमेदवारांना चिन्ह वाटप दि.10 नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे.

मतदान 19 नोव्हेंबर रोजी तर गुलाल कोणाचा म्हणजेच मतमोजणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राधानगरी तालुक्यात 14255 सभासद आहेत. तर करवीर तालुक्यात 12810 सभासद आहेत. तर 495 संस्था सभासद आहेत. तर भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रात 53 गावांचा समावेश आहे.