मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा जंगी सभेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे या सभेचे आयोजन केलं असून, तब्बल दोनशेहून अधिक एकरांवर या जंगी सभेचं आयोजन करण्यात आले असल्याने राज्य सरकारची ही धडधड वाढली आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा संघटनांचा आवाज आणखी बुलंद केला आहे. दरम्यान, सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. मात्र दिलेला शब्द राज्य सरकार पाळते की नाही. यावरुन पुढील भुमिका ठरणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंची सभा होणार आहे.


सध्या त्या सभेची तब्बल दोनशेहून अधिक एकरांवर जंगी तयारी करण्यात येत आहे. या विराट सभेला 15 ते 20 लाख लोक येण्याची शक्यता वर्तवली जात असून या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी गावचे आणि आजूबाजूच्या सव्वाशेहून अधिक गावाचे नागरिक सभेच्या तयारीसाठी पुढे आले असून लोकांच्या खाण्यापिण्यापासून, पार्किंग आणि इतर सुविधांसाठी सर्व जाती धर्माच्या अनके संघटनांनी पुढाकार घेतला आहे.