स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आमदार राजेश क्षीरसागर यांचे वडिल आणि कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आज उत्तरेश्वर पेठ परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सर्वसामान्य लोकांसोबत कायम नाळ बांधून ठेवलेल्या आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या स्व. विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी मंडळाच्या सदस्यांनी… Continue reading स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; 300 वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत

देवगड (प्रतिनिधी) : गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यंदाच्या महाशिवरात्रीला श्री देव रामेश्वराची कुणकेश्वर भेट घडली होती.… Continue reading श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; 300 वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत

‘हे’ आजार रोखण्याबाबत कोणती उपाययोजना केली..? : आ. सतेज पाटलांचा आरोग्यमंत्र्यांना सवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एचएमपीव्ही आणि जीबीएस या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे. असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जीबीएस आणि एचएमपीव्ही यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केल्याची माहिती दिली. आ. पाटील यांनी, जीबीएस या… Continue reading ‘हे’ आजार रोखण्याबाबत कोणती उपाययोजना केली..? : आ. सतेज पाटलांचा आरोग्यमंत्र्यांना सवाल

वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

सांगली ( प्रतिनिधी ) : वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्नसंदर्भात मंत्रालय येथे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. वाकुर्डे बुद्रुक योजनेमधील रेड कालव्याची गळती प्रतिबंधक कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करावा तसेच सदर… Continue reading वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील 4 हजार मजुर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधित मजुरांना त्यांची 45कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या… Continue reading पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

महायुतीचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या घोषणांचा परिपाक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा १,४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा, जोतिबा विकास प्राधिकरण आराखड्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नसल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. आ. पाटील म्हणाले की, निवडणुकांपुर्वी विकासाचे मृगजळ दाखवणाऱ्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची घोर… Continue reading महायुतीचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या घोषणांचा परिपाक : आ. सतेज पाटील

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला… Continue reading शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कोल्‍हापूर( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोकुळ प्रधान कार्यालयामध्ये महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे हस्ते व संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, कॉ.स्मिता पानसरे व मान्यवर… Continue reading ‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

‘कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्ह्यातील विविध 14 नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ,… Continue reading ‘कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन

पन्हाळगड रहिवाशांचा वर्ल्ड हेरिटेज युनोस्कोला विरोध

पन्हाळा : (प्रतिनिधी) पन्हाळा पर्यटन महोत्सवाच्या 13 D थेटरच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज मध्ये जात असून या विषयाची अंतिम मीटिंग मे मध्ये पॅरिस येथे होणार असुन जवळजवळ निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. या घोषणांनी पन्हाळा नागरिकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली. कारण शासनाच्या या धोरणामुळे पन्हाळा नागरिकांवर अनेक निर्बंध… Continue reading पन्हाळगड रहिवाशांचा वर्ल्ड हेरिटेज युनोस्कोला विरोध

error: Content is protected !!