बिद्री ( प्रतिनिधी ) पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचा निवडणूक कार्यक्रम आज गुरुवार दि. 12 आक्टोंबर रोजी जाहीर झाला आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 3 डिसेंबर रोजी मतदान तर 5 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.


तीन नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील. 20 नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होईल. तीन डिसेंबर रोजी मतदान तर पाच डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राधानगरी, भुदरगड,कागल आणि करवीर तालुक्यातील सात गावे असे एकूण 218 गावांचे कार्यक्षेत्र आहे.