Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
maratha reservation Archives -

आरक्षण द्या, राजकारणात येत नाही : मनोज जरांगे

कोल्हापूर : मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता यात्रा सुरू आहे. आज रांगे यांची कोल्हापुरात शांतता यात्रा निघाली. यावेळी बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. आमची राजकारणात येण्याची इच्छा नाही. पण सरकारने आरक्षण दिले नाही तर आमच्यापुढे राजकारणात येण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे सरकारने आरक्षण द्यावे,… Continue reading आरक्षण द्या, राजकारणात येत नाही : मनोज जरांगे

मनिष सिसोदियांना सर्वोच्च दिलासा ; मद्य धोरण प्रकरणात जमीन मंजूर

दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अबकारी धोरण प्रकरणात 17 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठानं तीन दिवसांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी या प्रकरणावरील आदेश राखून ठेवला होता. मनिष सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च… Continue reading मनिष सिसोदियांना सर्वोच्च दिलासा ; मद्य धोरण प्रकरणात जमीन मंजूर

…तर राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं ; मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

धाराशिव : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. यानंतर राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये शिरले होते. या आंदोलकांशी चर्चा करताना राज ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. मात्र, राज ठाकरेंच्या विरोधात झालेल्या आंदोलनावर मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा… Continue reading …तर राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं ; मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

मनोज जरांगेंच्या शांतता यात्रेची सत्ताधारी – विरोधकांना धाकधूक ?

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील जनजागृती शांतता यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. तर काही दिवसपूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे यांनी मराठवाड्यातून शांतता यात्रेला सुरुवात केली होती. तर या यात्रेची सांगता छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. यावेळी जरांगे यांनी विधानसभेच्या 288 जागा लढायच्या की उमेदवार पाडायचे ? याचा… Continue reading मनोज जरांगेंच्या शांतता यात्रेची सत्ताधारी – विरोधकांना धाकधूक ?

फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख मिळणार नाही : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस असेपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांती मिळणार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल, असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले आहेत.महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण याला खूप मोठी परंपरा आहे. मराठी माणसं नाटकांवर आणि… Continue reading फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख मिळणार नाही : संजय राऊत

शरद पवार आणि मराठा आंदोलकांच्यात बैठक ; मराठा आरक्षणावर पवारांकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी होत असताना शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार यांची भेट झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिला होता. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात चर्चा पार… Continue reading शरद पवार आणि मराठा आंदोलकांच्यात बैठक ; मराठा आरक्षणावर पवारांकडून भूमिका स्पष्ट

मराठा आरक्षणाविषयी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी आपले उपोषण पुन्हा एकदा स्थगित करत राज्य सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आता जरांगेंनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा अरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. तसेच विरोधक भूमिका स्पष्ट… Continue reading मराठा आरक्षणाविषयी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्यात बैठक ; आरक्षणावर चर्चा

मुंबई : सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील शनिवार (20 जुलै) पासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये… Continue reading मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्यात बैठक ; आरक्षणावर चर्चा

आता लाडक्या मेव्हणीची तयारी करा ; तर ‘या’नंतर योजना बंद होईल : मनोज जरांगेंची टीका

मुंबई : सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला आहे. एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रकार होत आहे आणि दुसरे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची. आशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या”, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांनी पुन्हा… Continue reading आता लाडक्या मेव्हणीची तयारी करा ; तर ‘या’नंतर योजना बंद होईल : मनोज जरांगेंची टीका

मनोज जरांगेंचा एल्गार, आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार

ला बसणार मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचे आज शनिवारी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. जरांगे अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण सुरु करतील. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते.… Continue reading मनोज जरांगेंचा एल्गार, आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार

error: Content is protected !!