नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना कहर केला आहे. गाझामधून सीमा ओलांडण्यासाठी हमासने पॅराग्लायडरचाही सहारा घेतला. या दहशतवाद्यांनी जमिनीवर उतरण्यापूर्वी आकाशातून गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी पॅराग्लायडरचा वापर करून मोठ्या उंचीवर सीमा ओलांडली ज्यामुळे इस्रायली सैनिक त्यांना पाहू शकले नाहीत.


हल्ला करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर आला आहे. ज्यात हमासचे दहशतवादी पॅराशूट घेऊन खाली उतरताना दिसत आहेत. ते शस्त्रांनी सज्ज आहेत. इस्त्रायलने आपल्या सीमेवर अत्यंत कडक सुरक्षा ठेवली आहे. येथे सेन्सर आणि कॅमेरेही बसवले आहेत. अशा परिस्थितीत, दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील नॉर्मंडी येथे अमेरिकन सैनिकांना उतरवण्यासाठी जी पद्धत वापरली गेली होती.


वेदनादायक चित्रे आली समोर..!

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अतिशय वेदनादायक चित्रे समोर येत आहेत. इस्रायली आर्मर्ड कॉर्प्सच्या 77 व्या बटालियनचे केवळ 19 वर्षीय सैनिक कॉर्पोरल नामा बोनी ड्युटीवर असताना हमासने हवाई, समुद्र आणि जमिनीद्वारे अचानक हल्ला केला.

गाझा पट्टीतून हजारो क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यानंतर शहरांतील रस्त्यांवर शेकडो मृतदेह पडून राहिले आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे या हल्ल्यानंतर हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली का ? असा सवाल केला जात आहे.