बिद्रीचं मैदान कोण मारणार ? प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय पटलावर मोठ्या उलाढाली पहायला मिळाले. याचं निमित्त होत बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं, याचा फैसला आज होणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या… Continue reading बिद्रीचं मैदान कोण मारणार ? प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात

कसबा बावडा ( वार्ताहर ) कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कसबा बावड्यातून हातात विविध संदेश देणारे घोषणापत्रे घेऊन जनजागृती फेरी काढत समाज प्रबोधन केले. डी.वाय.पाटील समूहाचे कार्यकारी संचालक… Continue reading डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात

‘गोकुळ’ने सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला- महेंद्र पंडित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत म्हणाले कि, सध्या सहकारात काम… Continue reading ‘गोकुळ’ने सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला- महेंद्र पंडित

कोल्हापूर दक्षिणच्या 24000 लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सर्वसामान्य गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने माजी आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून हे कार्ड… Continue reading कोल्हापूर दक्षिणच्या 24000 लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- माजी आमदार अमल महाडिक

नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा; पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले.… Continue reading नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा; पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

डी. वाय. कारखाना प्रतिटन ३२०० रुपये देणार : आ.सतेज पाटील

गगनबावडा (प्रतिनिधी) : असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ३२०० रुपये देणार आहे. एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कारखान्याने यावर्षीही कायम ठेवली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. आ.सतेज पाटील म्हणाले की, कारखान्याची चालू हंगामाची एफआरपी प्रतिटन ३ हजार ७६२ रुपये असून… Continue reading डी. वाय. कारखाना प्रतिटन ३२०० रुपये देणार : आ.सतेज पाटील

केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;खा. महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासह विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. मात्र खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील बस… Continue reading केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;खा. महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्या पाठीशी : आर.के. पवार

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अजित पवारांनी ईडीच्या भितीने गद्दारी केली. राज्यात आणि देशात शरद पवार यांना मानणारी जनता आहे. त्यामुळे आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा आहे. लवकरच जनतेच्या भरवशाचं सरकार निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी केले. ते… Continue reading सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्या पाठीशी : आर.के. पवार

मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा..! कानोलीत आला प्रत्यय

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील कानोली येथील ऐन दसऱ्याच्या सणात आपगे कुटुंबातील कर्ता आणि शरीराने अपंग असणारा रोहिदास उर्फ देवदास सखाराम आपगे याचे अल्पशा आजाराने ऐन खंडेनवमी दिवशी निधन झाले. त्यामुळे रोहिदासची आई घरी एकट्या पडल्या. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखिची असल्याने रोहिदासच्या वर्गमित्रांना त्याच्या कुटुंबाची वानवा समजली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. रोहिदासच्या वडिलांचे… Continue reading मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा..! कानोलीत आला प्रत्यय

गगनबावडा येथे यशवंतराव होळकर यांची २४७ वी जयंती उत्साहात संपन्न…

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुका मल्हार सेनेच्या वतीने आज गगनबावडा येथे महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोदेचे माजी सरपंच सहदेव कांबळे होते. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्याबरोबर अठरा वेळा लढाई केल्या आणि सर्व लढाया जिंकल्या.… Continue reading गगनबावडा येथे यशवंतराव होळकर यांची २४७ वी जयंती उत्साहात संपन्न…