खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खत विक्रेत्यांनी खताची विक्री करताना शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये तसेच खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी… Continue reading खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत करा : अमोल येडगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे, पीक कर्ज पुरवठा इत्यादी करिता पीक पाहणी नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी अॅपव्दारे दिनांक 15 जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. “माझी शेती माझा सातबारा मीच… Continue reading शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत करा : अमोल येडगे

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 2024 – 25 करिता ऊसदर जाहीर

कोल्हापूर,( प्रतिनिधी ): जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2024 -25 करिता ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 सहकारी व 7 खासगी असे एकूण 23 साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 2024 – 25 करिता ऊसदर जाहीर

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत 2025 या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर… Continue reading ‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

बच्चे सावर्डेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बच्चे सावर्डे गावात खडी विभागात सावर्डे – कांदे रोड जवळील बापुसो आनंदराव बच्चे यांच्या शेतात सातवे येथील बिरू लखू आंब्रे यांच्या शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता. दरम्यान पहाटे 4 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार करून नेत असताना आंब्रे यांना दिसले त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शेळीला तिथेच सोडून शेजारील ऊसात… Continue reading बच्चे सावर्डेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार..!

वारणा सहकारी कारखान्याची पहिली उचल 3,220 रुपये जाहीर : आ. डॉ. विनय कोरे

वारणा (प्रतिनिधी) : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम 2024-2025 मध्ये गळीताला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3,220 रुपये प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय आज कारखान्याचे चेअरमन आणि आमदार विनय कोरे यांनी घेतला. तसेच सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 30 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखान्याच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचेही आ. कोरे यांनी सांगितले. आ.… Continue reading वारणा सहकारी कारखान्याची पहिली उचल 3,220 रुपये जाहीर : आ. डॉ. विनय कोरे

शियेत मेंढपाळांच्या वस्तीवर बिबट्याने केला एका शेळीवर हल्ला

टोप (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोतिबा डोंगर ते सादळे – मादळे या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. मंगळवारी शिये (ता. करवीर) येथील डोंगर शेजारी असणाऱ्या धाकोबा मंदिर परिसरात रात्री ९ च्या सुमारास वस्तीवर आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवून एका शेळीचा पडशा पाडला. बिबट्याने हल्ला करताच मेंढ्यानी आरडा ओरड सुरू… Continue reading शियेत मेंढपाळांच्या वस्तीवर बिबट्याने केला एका शेळीवर हल्ला

‘या’ ठिकाणी राहतात सर्वांधिक श्रीमंत शेतकरी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा अशा राज्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. प्रामुख्याने शेती करणारे शेतकरी हे काळानुसार आधुनिक शेती करत आहेत. आधुनिकीकरणाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये खूप प्रगती केलेली आपल्याला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक श्रीमंत शेतकरी कोणत्या राज्यात कोणत्या गावात राहतात हे माहित आहे का तुम्हाला..?… Continue reading ‘या’ ठिकाणी राहतात सर्वांधिक श्रीमंत शेतकरी..!

राज्यातील साखर कामगारांचा बेमुदत संप…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राज्यातील साखर कामगारांचे गेल्या 25 महिन्यांचे पगार थकले असल्याने ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आंदोलनावर ठाम आहेत. 16 डिसेंबरपासून संपाचा एल्गार पुकारणार आहेत. राज्यातील सुमारे पावणेदोन लाख कामगार संपावर जाणार आहेत. कामगारांच्या वेतनाबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो.… Continue reading राज्यातील साखर कामगारांचा बेमुदत संप…

श्री दत्त (शिरोळ) 53 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु : गणपतराव पाटील

शिरोळ (प्रतिनिधी) : श्री दत्त – शिरोळ कारखान्याच्या सन 2024 – 2025 या 53 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी 10 : 51 वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी 10 : 00 वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या शुभहस्ते काटापूजन करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.… Continue reading श्री दत्त (शिरोळ) 53 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु : गणपतराव पाटील

error: Content is protected !!