श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार या वर्षीपासून सुरु केला आहे. हा पुरस्कार 2023 सालासाठी संगीत क्षेत्रातील जेष्ठ विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे.… Continue reading श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची आज सदिच्छा भेट घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापुरात जन्मलेले सुशीलजी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा हेच इस्रायलचे लक्ष्य; गुंतले 10, 000 सैन्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमाससोबत सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धात इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) गाझावर जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे हल्ला करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर कहर करत आहे. इस्त्रायली लष्करही सर्वसामान्यांवर अत्याचार करत असल्याचा हमासचा आरोप आहे. मात्र, इस्रायलने आपले लक्ष्य हमासचे दहशतवादी असून नागरिक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.… Continue reading ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा हेच इस्रायलचे लक्ष्य; गुंतले 10, 000 सैन्य

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करा; प्रशासनाने केले आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबतची माहिती घेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने घेतले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र… Continue reading ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करा; प्रशासनाने केले आवाहन

ग्रंथालय अनुदान विषयक कामकाज ऑनलाइन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारीत “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली (Library Grant Management System) विकसीत करण्यात आली आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान… Continue reading ग्रंथालय अनुदान विषयक कामकाज ऑनलाइन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. पंडारा रोड येथील सरकारी टाईप-7 बंगल्याचा ताबा कायम ठेवण्याचा त्यांना अधिकार नसल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा बंगला लुटियन्स दिल्लीमध्ये आहे. मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल म्हणून काम केलेल्या खासदारांना असे बंगले दिले जातात.… Continue reading सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शनिवारी गाझा पट्टीतून सराइल भागांवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. यादरम्यान, पॅलेस्टिनी बंडखोर गट हमासशी संबंधित डझनभर सैनिक दक्षिणेकडून इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलच्या आपत्कालीन सेवेने म्हटले आहे की, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हमासने गाझा पट्टीतून… Continue reading जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

टोप ( प्रतिनिधी ) शाळांचे खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट सरकारचा चालू आहे. दिवसा शाळा आणि रात्री तेथे नको ते उद्योग उद्योगपती करतील. शाळांचे खाजगीकरण म्हणजे भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. असे मत शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त… Continue reading ”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

कोल्हापूर जिल्ह्यासाठी रस्त्यांसाठी ८९.३४ कोटी मंजूर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपये मंजूर झाले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी खासदार धनंजय… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यासाठी रस्त्यांसाठी ८९.३४ कोटी मंजूर

error: Content is protected !!