कुरुंदवाड येथे गांजाचे सेवन अन् विक्री करणाऱ्या तिघांना अटक…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील एका महाविद्यालयाच्या गेटसमोर उघड्यावर गांजाचे सेवन करताना दोघांना तर विक्री करताना एकाला असे तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केलीय. अमन शफी अत्तार (वय २४) आणि साद महेनुद्दीन बागवान (वय २३, दोघे रा. कुरुंदवाड) यांना गांजा सेवन करताना अटक केलीय. तर तरबेज शेख (रा.मिरज) याला गांजा विक्री करताना अटक केलीय. ही कारवाई कुरुंदवाड… Continue reading कुरुंदवाड येथे गांजाचे सेवन अन् विक्री करणाऱ्या तिघांना अटक…

कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणात डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंब्यातील दवाखान्यासह ठिकठिकाणी गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार काल (बुधवारी) कळंबा येथील साई मंदिर परिसरात असणाऱ्या श्रद्धा दवाखाना आणि करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथे पोलिसाच्या मदतीने आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर… Continue reading कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणात डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात…

आसूर्लेत महिलेकडे सापडला अर्धा किलो गांजा पन्हाळा पोलिसांची कारवाई,महिलेसह दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी..!

पन्हाळा : प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील मध्य वस्तीत आसलेल्या घरावर पन्हाळा पोलीसांनी धाड टाकून चारशे सत्तर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.या कारवाईत रंजना रमेश नावर वय ४९ रा आसुर्ले त.पन्हाळा व राजु मकबूल मुल्ला रा.अंकलखोप जि. सांगली या दोघांना गुरुवार ता.०६ रोजी ताब्यात घेतले याबाबत पन्हाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना चार दिवसाची… Continue reading आसूर्लेत महिलेकडे सापडला अर्धा किलो गांजा पन्हाळा पोलिसांची कारवाई,महिलेसह दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी..!

अखेर मटकाकिंग सम्राट कोराणे पोलीसांच्या ताब्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात मटक्याचा व्यवसाय करणारा सम्राट कोराणे हा गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत होता. बुधवारी कोराणे हा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला होता. न्यायालयाने त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. आज सकाळी पोलिसांनी त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. सम्राट कोराणे याच्यावर पाच वर्षांपूर्वी मोक्कातंर्गत गुन्हा दाखल… Continue reading अखेर मटकाकिंग सम्राट कोराणे पोलीसांच्या ताब्यात…

पेद्रेवाडीत ४५० काजू झाडांसह गवत आगीच्या भक्ष्यस्थानी : पोलीसांत तक्रार

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील विद्या वसंतराव चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर ७१९/३ मधील ४५० काजूची झाडे आणि गवत हे हद्दीच्या वादातून सूडबुद्धीने पेटवले असल्याची तक्रार आजरा पोलिसात दिली आहे. ४ फेब्रुवारीरोजी दुपारच्या सुमारास या काजू झाडांना आणि गवताला आग लागली. यामध्ये मोहरलेली ४५० काजूची झाडे आणि गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये सुमारे… Continue reading पेद्रेवाडीत ४५० काजू झाडांसह गवत आगीच्या भक्ष्यस्थानी : पोलीसांत तक्रार

दोन मोटरसायकल चोरट्यांना सापळा लावून पोलिसांनी पकडले..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. हा तपास पथकामार्फत मोटर सायकल… Continue reading दोन मोटरसायकल चोरट्यांना सापळा लावून पोलिसांनी पकडले..!

नंदगाव येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील नंदगाव येथील अश्विनी अनिल कोरे (वय 36) या विवाहित महिलेने आज 21 जानेवारीरोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी कोरे या महिलेने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने बडोद्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र,आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इस्पुलीं… Continue reading नंदगाव येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…

18 हजारांची लाच घेताना गडहिंग्लजमधील डॉक्टर, प्रशासकाला रंगेहाथ अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधील डॉक्टर आणि प्रशसासकाला लाच घेताना पोलीसांनी रंगेहाथ अटक केलीय.अजित वसंतराव पाटोळे (वय ४९, रा. साधना हायस्कूल जवळ, संभाजीनगर, गडहिंग्लज) असे याचे नाव आहे. तर इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे (वय ४८,रा.मिसाळ चाळ,आझाद रोड गडहिंग्लज) या दोघांना अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मित्र हा दिनांक 10 जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास चक्कर येऊन खाली… Continue reading 18 हजारांची लाच घेताना गडहिंग्लजमधील डॉक्टर, प्रशासकाला रंगेहाथ अटक…

मुलीच्या उपचाराचे कारण सांगून महिलेनं महिलांना लुटलं..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उचगाव इथल्या अनेक महिलांकडून मुलीच्या उपचारांसाठी आणि इतर कारणे सांगून सुमारे 23 लाख 92 हजाराची फसवणूक केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर (वय 65, रा. उचगाव) यांनी दिली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत नजमा नजीर अहमद मुल्ला (वय सुमारे 35, रा. जानकीनगर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नजमा हिने मुलीच्या उपचारांसाठी पैशांची… Continue reading मुलीच्या उपचाराचे कारण सांगून महिलेनं महिलांना लुटलं..!

प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघींना रंगेहात पकडले

आजरा (प्रतिनिधी ) : आजरा महागाव बसमधून प्रवास करणाऱ्या हात्तिवडे येथील सुलोचना सतीश चव्हाण या महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या पूजा चौगुले व आरती लोंढे या निपाणी येथील दोघी महिलांना रंगेहात पकडून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसात सदर गुन्हा नोंद झाला आहे. वेळवट्टी येथील निकिता देसाई हिने प्रसंगावधान दाखवत या दोन महिलांना पोलिसांच्या ताब्यात… Continue reading प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघींना रंगेहात पकडले

error: Content is protected !!