सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची आज सदिच्छा भेट घेतली.


चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापुरात जन्मलेले सुशीलजी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन ते आयएएस झाले अन् भारत सरकारच्या विविध जबाबदाऱ्या अतिशय उत्तम प्रकारे सांभाळल्या. त्यांचे रेल्वे विभागातील काम इतके उत्तम होते, की विभागाकडून चारवेळा त्यांचा सन्मान करण्यात आला. एक उत्तम प्रशासक, अभ्यासक विचारवंत, लेखक अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची भेट घेऊन पाटील यांना अतिशय आनंद झाला.


यासोबतच पाटील यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीमातेचे प्रतिरुप असलेल्या श्री रुपाभवानी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. सर्वांना उत्तम आरोग्याससह सुख समृद्धी आणि समाधान लाभो ही आईच्या चरणी प्रार्थना केली. चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील श्री श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच त्यांचे गुरू श्री ईश्वरानंद स्वामीजी (आप्पाजी) यांचेही आशीर्वाद घेतले.