लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. लाईव्ह मराठीने याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्यांशी संपर्क करत भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा केली असता त्यांनी माझा भाजप प्रवेश ही केवळ अफवा असल्याचं… Continue reading लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

पत्रकारास धक्काबुक्की प्रकरणात सोलापुरातील एकावर गुन्हा दाखल

बार्शी ( प्रतिनिधी ) जबाबदारी पार न पाडता वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयंम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेद अभियान अंतर्गत काम… Continue reading पत्रकारास धक्काबुक्की प्रकरणात सोलापुरातील एकावर गुन्हा दाखल

विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या वैभवाला साजेसे व्हावे- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनीधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात 100 व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते भाऊ कदम आणि आमदार सुभाषबाबू यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सोलापूरच्या वैभवाला साजेसे संमेलन व्हावे ही सर्व सोलापूरकरांची भावना… Continue reading विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या वैभवाला साजेसे व्हावे- मंत्री चंद्रकांत पाटील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हे ब्रीद वाक्य घेऊन तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि,… Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी एकादशी यानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहून विठूरायाच्या चरणी लीन झाले. चंद्रकांत पाटील यांनी पाऊस कमी झाल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट टळावे, राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो अशी प्रार्थना केली.… Continue reading राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

आमदार समाधान आवताडेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरामध्ये 747 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा… Continue reading आमदार समाधान आवताडेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी ( पंढरपूर ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते सायं.9 पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर… Continue reading आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

उजनीतून पिण्याचे पाणी, रब्बी आवर्तनासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन– मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची दूरदृश्यप्रणालीद्वारे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बीचे व… Continue reading उजनीतून पिण्याचे पाणी, रब्बी आवर्तनासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन– मंत्री चंद्रकांत पाटील

महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

पंढरपुर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत आता सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथे ही सकल मराठा समाजाने आपला रोष व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांना… Continue reading महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

‘भीमा साखर’चा काटा चोख, यंदा पेमेंट देणार रोख – चेअरमन विश्वराज महाडिक

सोलापूर ( प्रतिनिधी ) भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर कारखान्याचा 44 वा बॉयलर अग्नी प्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुरु होत असलेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल 5 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची… Continue reading ‘भीमा साखर’चा काटा चोख, यंदा पेमेंट देणार रोख – चेअरमन विश्वराज महाडिक

error: Content is protected !!