धक्कादायक..! शिक्षणाधिकाऱ्याकडे आढळली बेकायदा 5 कोटी 85 लाख 85 हजाराची अपसंपदा

सोलापूर ( प्रतिनिधी ) शासकीय अधिकाऱ्यांनी लाच घेत सामान्य जनतेची पिळवणूक केली असल्याची प्रकरणे आपण अनेकदा वाचली असतील, मात्र सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे… Continue reading धक्कादायक..! शिक्षणाधिकाऱ्याकडे आढळली बेकायदा 5 कोटी 85 लाख 85 हजाराची अपसंपदा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

नागपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नागपूर येथे उपस्थित राहिले. नव्या पिढीने जाय सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मूजी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले. भारतीय मूल्यांना… Continue reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार

पुणे : शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन टप्प्यातील महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत हा बदल केला जाणार आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होणार आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक… Continue reading दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार

गेल्या 18 वर्षात 41.5 कोटी भारतीय आले गरिबीतून बाहेर- UNO

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्राने भारतासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. यानुसार गेल्या 18 वर्षांत भारतातील गरिबीची पातळीवर काहीशी कमी होते 41.50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भारतात संपत्तीमध्ये प्रचंड असमानता असल्याचं ही म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती… Continue reading गेल्या 18 वर्षात 41.5 कोटी भारतीय आले गरिबीतून बाहेर- UNO

आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

पाटणा ( वृत्तसंस्था ) दोन्ही बहिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोघींचं लग्नही झाले. घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सिवानमधून पळ काढला आणि पाटणा गाठले. त्यानंतर हे प्रकरण पटनाच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. समुपदेशनाच्या प्रयत्ना दरम्यान पोलीस ठाण्यातच मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यानंतर दोन्ही मुलींनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला की, दोघी ही प्रौढ असून त्यांनी एकमेकांशी… Continue reading आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार 12 वीपर्यंतच्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची व्यवस्था लवकरच करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार केला आहे. संबंधितांचे मत जाणून घेण्यासाठी धोरणाचा मसुदा पाठवला जात आहे. याची माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलींना याचा सर्वाधिक फायदा होईल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली ही… Continue reading मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून मुलाखतीला आत्मविश्वासाने व संयमाने सामोरे जावे. असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे आयोजित दोन दिवसीय ‘कोल्हापूर… Continue reading ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट : आ. सतेज पाटील

कोल्हापूर ‘दक्षिण जॉब फेअर’ला सुरुवात : तब्बल 248 कंपन्याचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या जॉब फेअरमध्ये 248 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून 12 हजार 500 नोकरीसाठी इच्छूक असलेल्यांनी नोंदमी केली आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे 5 आणि 6… Continue reading कोल्हापूर ‘दक्षिण जॉब फेअर’ला सुरुवात : तब्बल 248 कंपन्याचा सहभाग

आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा : डॉ. अमित आंद्रे

कसबा बावडा (प्रतिनिधी) : आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून अचूक पद्धतीने काम करू शकतो. पुढील दहा वर्षात या क्षेत्रात मोठी संधी असून त्याचा विद्यार्थांनी फायदा घ्यावा, असे आवाहन ‘दि डेटा टेक लॅब्स’चे मुख्य… Continue reading आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा : डॉ. अमित आंद्रे

पीएचडीसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी : ठाकरे गटाच्या युवासेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सारथी संस्थेमार्फत पीएचडी शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. महाविकास आघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जितके विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट व पीएचडी कन्फर्मेशन तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी आपल्या सरकारने शिष्यवृत्ती सरसकट न देता फक्त दोनशे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला… Continue reading पीएचडीसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी : ठाकरे गटाच्या युवासेनेची मागणी