मुंबई ( प्रतिनिधी ) ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारीत “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली (Library Grant Management System) विकसीत करण्यात आली आहे.


यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालयाचे संचालक दत्तात्रेय शिरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित आहेत.


या माध्यमातून ग्रंथालयांच्या अनुदान विषयक सर्व कामकाज ऑनलाइन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे. अनुदान वितरण प्रक्रीयेचा जिल्हा स्तरावरील टप्पा कमी झाल्यामुळे राज्यात सर्व ग्रंथालयांना एकाच दिवशी आणि एकाच वेळी या ऑनलाइन प्रणालीमुळे अनुदान मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.