निस्वार्थपणे वडकशिवालेकरांची मदत करणे : आ. मुश्रीफ

वडकशिवाले ( प्रतिनिधी ) : आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील ग्रामस्थांनी सुनील दिवटे यांच्या नेतृत्वाखाली एक रुपयाही न घेता 344 मतांचे लिड विधानसभा निवडणूकीत दिले असून त्यांचे हे रृण कदापि विसरणार नसल्याचे गौरवोद्गार हसन मुश्रीफ यांनी काढले. उत्तूर येथे उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अद्यक्षस्थानी आजरा कारखान्याचे अद्यक्ष वसंतराव धुरे… Continue reading निस्वार्थपणे वडकशिवालेकरांची मदत करणे : आ. मुश्रीफ

आ. हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

उत्तूर (प्रतिनिधी) : गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काबाडकष्ट करणारा मी बिनमारका राबणारा बैल आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी कसेही हाका. जनतेने खांद्यावर दिलेले जू टाकणार नाही आणि सरी सोडूनही जाणार नाही, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मी हिंस्र वाघही नाही आणि टायगरही नाही,असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तूरमध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात… Continue reading आ. हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

कोल्हापूर जिल्ह्यास किमान चार मंत्री पदे – पालकमंत्री कोण ? याविषयी मोठी उत्सुकता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सधन समजल्या जाणाऱ्या आणि सहकार दूध पट्ट्यातील महत्त्वाच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपा शिवसेना रिपाई घटक पक्षाच्या महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत काँग्रेस सह महाआघाडीचा शब्दश: सुपडा साफ केला आहे. त्यामुळे कोल्हापुरातून आता कोणाकोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये मुख्यत्वाने कोल्हापूर जिल्ह्यास तीन ते चार मंत्री पदे मिळणार का?… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यास किमान चार मंत्री पदे – पालकमंत्री कोण ? याविषयी मोठी उत्सुकता

संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खर्ची घालतो : हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) : हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार प्रफुल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्याने निवडून द्या. राज्यात यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळेल. हे नेतृत्व सांभाळणं, जोपासणे आणि अजूनही मोठं करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते… Continue reading संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खर्ची घालतो : हसन मुश्रीफ

मंडलिक – पाटील एकत्र आल्यानंतर क्रांती होते : प्रवीणसिंह पाटील

मुरगुड (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात,त्यांना जे सोडून जातात त्यांचा पराभव होतो. परंतु मी त्यांचा आदर ठेवून अत्यंत विनयाने सांगतो,2009 ला लोकनेते स्वर्गीय खा. सदाशिवराव मंडलिक त्यांना सोडून गेले. ते पराभूत झाले नाहीत. उलट बंडखोरी करून त्यांनी क्रांतिकारी आणि ऐतिहासिक विजय मिळविला.तशीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होऊन ना. हसन मुश्रीफ हे विक्रमी मताधिक्याने विजयी… Continue reading मंडलिक – पाटील एकत्र आल्यानंतर क्रांती होते : प्रवीणसिंह पाटील

कागलमध्ये मुश्रीफ गटाला विविध कार्यकर्त्यांनी दिला जाहीर पाठिंबा

कागल (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे सभा,मेळावे,सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक कार्यकर्ते एका गटातून दुसर्‍या प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कागल गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्था तसेच महाराष्ट्र बांधकाम… Continue reading कागलमध्ये मुश्रीफ गटाला विविध कार्यकर्त्यांनी दिला जाहीर पाठिंबा

कागलमध्ये धनगर गल्लीतील तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये जाहीर प्रवेश

कागल (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक कार्यकर्ते एका गटातून दुसर्‍या प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कागल शहरातील धनगर गल्लीतील कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ गटामध्ये प्रवेश केला. यामध्ये जीवबा कोंडीबा, शेळके युवराज, अण्णाप्पा रानगे, धुळाप्पा खानू शेळके, विलास रामा रानगे, उत्तम युवराज बोते,… Continue reading कागलमध्ये धनगर गल्लीतील तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये जाहीर प्रवेश

हसन मुश्रीफांना अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचा जाहीर पाठिंबा

कागल (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे प्रचार दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभुमीवर संयुक्त कलाकार एकता वेल्फेअर फाउंडेशन संचलित अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचे अध्यक्ष जयवंतराव… Continue reading हसन मुश्रीफांना अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचा जाहीर पाठिंबा

बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर : हसन मुश्रीफ

निपाणी (प्रतिनिधी) : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर आहे, यावेळी मुश्रीफांनी अशी भावना व्यक्त केली. निपाणी येथे आयोजित बोधपीठ मेळावा आणि गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तभक्त दत्तामामा बर्गे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. या मेळाव्यात गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तामामा बर्गे यांना हसन मुश्रीफ आणि श्री.पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज डॅा.संजयपंत महाराज -बाळेकुंद्रीकर… Continue reading बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर : हसन मुश्रीफ

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा हसन मुश्रीफांना पाठिंबा

उत्तूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी ना. हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला.ना. हसन मुश्रीफ यांनी उत्तुर येथील घरी जाऊन भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,उमेश आपटे यांनी माझ्या विधायक कार्याला आणि जनसेवेला ही समर्थन दिले आहे.… Continue reading जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा हसन मुश्रीफांना पाठिंबा

error: Content is protected !!