कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपये मंजूर झाले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २८ रस्त्यांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यातून २८ पैकी २४ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार १२०.२४ किलोमीटर लांबीचे रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बनले जाणार आहेत.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत, आजरा तालुक्यात साडेदहा किलोमीटर रस्त्यांसाठी ७ कोटी २२ लाख ९९ हजार रूपये, भुदरगड तालुक्यातील २१.३७५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी १६ कोटी ४ लाख ७८ हजार रूपये, चंदगड तालुक्यातील २१.१८० कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी १८ कोटी ८८ लाख ७४ हजार रुपये, गगनबावडा तालुक्यातील ६.८९० कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी ४ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये, हातकणंगले तालुक्यातील १६.१०५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी १० कोटी ११ लाख ६८ हजार रुपये, करवीर तालुक्यातील १२.०९० कि.मी. रस्त्यासाठी ९ कोटी १७ लाख ८९ हजार रुपये.

पन्हाळा तालुक्यातील ६.८२० कि.मी. रस्त्यासाठी ५ कोटी ९४ लाख ५३ हजार रुपये, राधानगरी तालुक्यातील १३.०२० कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी ७ कोटी २७ लाख ४२ हजार रुपये, शाहूवाडी तालुक्यातील ३.०३० कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ४३ लाख ३१ हजार रुपये आणि शिरोळ तालुक्यातील ९.१९० कि.मी लांबीच्या रस्त्यासाठी ७ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपये, असे जिल्हयातील एकूण १२०.२४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी, ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.