कंटेनरचा ताबा सुटल्याने तवंदी घाटात भीषण अपघात

कोल्हापूर: रस्ते काम आणि पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. तवंदी घाटात काल कंटेनरचा ताबा सुटल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हापूरातील निपाणीजवळ मोठा भीषण अपघात झाला. काल सायंकाळी तवंदी घाटात अपघाताची घटना घडली. कंटेनर, चारचाकी आणि दुचाकीची जोरात धडक… Continue reading कंटेनरचा ताबा सुटल्याने तवंदी घाटात भीषण अपघात

होंडा कारची रिक्षेला जोराची धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू

कोल्हापूर – गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील सदाशिव बाबू फेगडे (वय 42) यांचा शुक्रवार ( दि.13) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला होता. हा अपघात औरनाळ फाटा येथे झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारापूर्वी साडे नऊच्या सुमारास मृत्यु झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली… Continue reading होंडा कारची रिक्षेला जोराची धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू

आयशर टेम्पोने दिली मोटारसायकला धडक, मोटारसायकल स्वारचा मृत्यू

कोल्हापूर – गगनबावडा तालुक्यातील गोरिवडे येथे राहत असलेले सचिन रामचंद्र वडाम (वय 29) यांचा बुधवार (दि.11) रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात बावेली नदीच्या कॉर्नर परिसरात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात… Continue reading आयशर टेम्पोने दिली मोटारसायकला धडक, मोटारसायकल स्वारचा मृत्यू

सरवडे अपघात: ट्रक-बोलेरो धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

  राधानगरी – राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहे राधानगरी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 12:30 वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (क्रमांक KA28AA8206) आणि बोलेरो (क्रमांक MH42H3064) यांच्यात… Continue reading सरवडे अपघात: ट्रक-बोलेरो धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

सायबर चौकात भरधाव कारचा थरार; चौघांना चिरडले; एक ठार..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील कारने चौघांना चिरडले असून त्यापैकी एक ठार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या दरम्यान सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने चौघांना चिरडले असून त्यापैकी एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा… Continue reading सायबर चौकात भरधाव कारचा थरार; चौघांना चिरडले; एक ठार..!

कोल्हापूर: उपचारासाठी माहेरी आली अन् जीवास मुकली; आई,भाऊ अत्यवस्थ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जुबेर काझी, अफरीन बुखारी, फरजाना काझी हे कात्यायनी, ता. करवीर येथील रहिवाशी आहेत. यापैकी अफरीन बुखारीचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले असून, गेल्या काही दिवसांपासून तीला संधिवाताचा त्रास आहे. तिच्या उपचारासाठी हे कुटुंबिय सायंकाळी कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलं होतं. दरम्यान 18 मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास यांच्या दुचाकीला शेतातील जनावराने… Continue reading कोल्हापूर: उपचारासाठी माहेरी आली अन् जीवास मुकली; आई,भाऊ अत्यवस्थ

रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे वय 20 यांची प्राणज्योत मालवली. मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गोव्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. कोमात असतानाही झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने प्रतिसाद दिला होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आहे. त्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराला… Continue reading सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

धक्कादायक..! शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तीन ठार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथील जाधव कुटूंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव, व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला कार क्रमांक (एम एच 09 जी एफ 8323) ने जात असताना अपघात झाला असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण… Continue reading धक्कादायक..! शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तीन ठार

धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

कागवाड ( प्रतिनिधी ) कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर आज एक ट्रॅक्टर ट्रॉली रोडबाळनजीक इंदिरानगरजवळ आला असता ट्रॉली रस्त्याकडेने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कोसळल्याने अपघात झाला असून, यात चार महिला ठार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने कागवाड पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 5… Continue reading धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

error: Content is protected !!