…तर दुध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरणार – शौमिका महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा दुध संघाने गाय दुध दरात कपात केल्याचा निर्णय घेतला आहे. याला दुध उत्पादकांचा विरोध असून, तातडीने दूध दरवाढ द्यावी अशी मागणी दुध उत्पादक करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोकूळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी याबाबत भाष्य केले असून मी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत… Continue reading …तर दुध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरणार – शौमिका महाडिक

कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मंडलाचे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा… Continue reading कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

आमदार पी.एन.पाटील यांचे पुतणे डॉ. रोहित पाटील यांचे निधन

सडोली ( प्रतिनिधी ) मा.आमदार पी.एन.पाटील यांचे पुतणे आणि श्री. बाजीराव नारायणराव पाटील (सडोलीकर) यांचे सुपुत्र डॉक्टर रोहित पाटील यांचे दुःखद निधन झाले असून, यामुळे सडोली परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टर रोहित पाटील यांनी आपली डिग्री ही समाजाच्या सेवेसाठी असते, ही ठाम भावना कायम ठेवत कोविड काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता अखंड सेवा दिली.… Continue reading आमदार पी.एन.पाटील यांचे पुतणे डॉ. रोहित पाटील यांचे निधन

ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व “दक्षिणोत्तर” -राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामास प्राधान्य देणे, नागरिकांना न्याय देण्याच काम करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील बरेच प्रश्न, विकास कामे मार्गी लागली… Continue reading ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व “दक्षिणोत्तर” -राजेश क्षीरसागर

धक्कादायक..! कुरुंदवाडमध्ये अज्ञातांकडून शेतकऱ्याचा खून

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल भिमराव चव्हाण (वय ५५ रा. जुण्या पाण्याच्या टाकीजवळ, कुरुंदवाड) असे खून झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या नागझरी येथील गवती कुरणातील शेतात ही घटना घडली आहे.… Continue reading धक्कादायक..! कुरुंदवाडमध्ये अज्ञातांकडून शेतकऱ्याचा खून

पन्हाळा, जाफळे येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण लवकर मिळण्यासाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे ता.पन्हाळा येथील वसंत रंगराव पाटील व सुरेश चंदर जगदाळे या दोघांनी पन्हाळा तहसील कार्यालया समोर घटस्थापनेचा मुहूर्त साधत रविवारी सकाळी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आमरण उपोषणाला बसलेल्या पाटील व जगदाळे यांनी आपल्या मागण्यांबाबत माहिती देताना सांगितले की,… Continue reading पन्हाळा, जाफळे येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

बाजारभोगाव व परखंदळे येथे मटका अड्ड्यावर छापा; चौघांना अटक !

कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे श्रुतिका हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर लोकांकडून कल्याण मटका घेताना पांडुरंग उचाप्पा खोत वय 65 मोताईवाडी ता.पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार रा .करंजफेन ता. शाहूवाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण 10135 रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर पो.कॉ. प्रवीण… Continue reading बाजारभोगाव व परखंदळे येथे मटका अड्ड्यावर छापा; चौघांना अटक !

23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शासनाचा कोणताही विभाग असो कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने गतिमान व्हावे, सामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयाचे उंबरे झीजवायला लावू नका, जनता सोशिक असते म्हणून जनतेला त्रास देऊ नका अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ… Continue reading 23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

बिद्री ( प्रतिनिधी ) पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचा निवडणूक कार्यक्रम आज गुरुवार दि. 12 आक्टोंबर रोजी जाहीर झाला आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या 25… Continue reading भोगावतीसह ‘बिद्री’चं ही बिगुल वाजलं…!

वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

error: Content is protected !!