पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण लवकर मिळण्यासाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे ता.पन्हाळा येथील वसंत रंगराव पाटील व सुरेश चंदर जगदाळे या दोघांनी पन्हाळा तहसील कार्यालया समोर घटस्थापनेचा मुहूर्त साधत रविवारी सकाळी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.


आमरण उपोषणाला बसलेल्या पाटील व जगदाळे यांनी आपल्या मागण्यांबाबत माहिती देताना सांगितले की, मराठा समाजास सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, जात निहाय जनगणना करून प्रत्येक जातीस ज्या त्या जातीच्या लोकसंख्ये नुसार आरक्षण द्या, मराठा समाजास 24 टक्के आरक्षण द्या, आर्थिक निकषा नुसार आरक्षण द्या अशा चार मागण्या आपण केल्या आहेत असे सांगितले.


आमरण उपोषणाला मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरी आम्ही दोघे बसलो असलो तरी मराठा आरक्षण मिळाल्या खेरीज हे उपोषण सोडणार नाही असेही वसंत पाटील व सुरेश जगदाळे यांनी सांगितले.