सडोली ( प्रतिनिधी ) मा.आमदार पी.एन.पाटील यांचे पुतणे आणि श्री. बाजीराव नारायणराव पाटील (सडोलीकर) यांचे सुपुत्र डॉक्टर रोहित पाटील यांचे दुःखद निधन झाले असून, यामुळे सडोली परिसरात शोककळा पसरली आहे.

डॉक्टर रोहित पाटील यांनी आपली डिग्री ही समाजाच्या सेवेसाठी असते, ही ठाम भावना कायम ठेवत कोविड काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता अखंड सेवा दिली. या काळात त्यांनी अनेक रुग्णांना प्रभावी उपचार देत आपला पेशा सांभाळला. अतिशय विनम्र आणि सेवाभावी वृत्तीचे असणारे डॉक्टर निघून गेल्याने सडोली पंचक्रोशीवर एकच शोककाळ पसरली आहे.


इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातही बजावली सेवा

डॉक्टर पाटील यांनी आपल्या सेवाकाळात इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातही सेवा बजावली आहे. या दरम्यान त्यांनी रुग्णांना दिलेली सेवा एकूणच रुग्णालय प्रशासनाचा सांभाळलेला कारभार यावरून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र अचानक त्यांच्या निघून जाण्याने एक सेवाभावी डॉक्टर हरवल्याची भावना अनेकांमध्ये आहे.