कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे श्रुतिका हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर लोकांकडून कल्याण मटका घेताना पांडुरंग उचाप्पा खोत वय 65 मोताईवाडी ता.पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार रा .करंजफेन ता. शाहूवाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली.


एकूण 10135 रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर पो.कॉ. प्रवीण मारुती पाटील यांनी दिली असून पुढील तपास पो.हे.कॉ कुंभार करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरताच एकच खळबळ उडाली आहे.


तर दुसऱ्या ठीकाणी परखंदळे ता. पन्हाळा येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बापू कांबळे यांच्या पडक्या घराशेजारी उघड्यावर मुंबई मटका आणि जुगार घेताना रविंद्र रघुनाथ कुंभार वय 38 रा.पणुत्रे  ता.पन्हाळा व अशोक रामचंद्र राबाडे रा.कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 11920 रुपयांची रोख रक्कम व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाणे पो.कॉ.सागर पांडुरंग पाटील यांनी दिली असून पुढील तपास स.फौ.एम.एन.खाडे करत आहेत.