वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

अखेर ‘भोगावती’चं बिगुल वाजलं…! 20 नोव्हेंबरला ठरणार गुलाल कोणाचा ?

भोगावती (प्रतिनिधी) – पावसामुळे गेले काही महिने स्थगित केलेला भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम बुधवार दि. 25 आक्टोंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. प्रशासनाने पावसाचं कारण देत हा निवडणूक कार्यक्रम काही वेळ स्थगित केला होता. यानंतर आता निवडणूक लागली असून, संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 जून रोजी छाननी… Continue reading अखेर ‘भोगावती’चं बिगुल वाजलं…! 20 नोव्हेंबरला ठरणार गुलाल कोणाचा ?

शासकीय योजनांचा लाभ पोचविण्याचे काम माने कुटुंबाने केले- आमदार विनय कोरे

टोप ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या सत्तेच्या घडामोडींमुळे राज्याच्या चांगल्या योजना दुर्लक्षित राहिल्या होत्या. या योजना मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम अंबपमधील माने कुटुंबाने केले आहे. असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी केले. ते अंबप येथील संजय गांधी निराधार योजनेच्या आदेश वाटपावेळी बोलत होते. यावेळी परिसरातील 250 लाभार्थ्यांना योजनेचे आदेश वाटप… Continue reading शासकीय योजनांचा लाभ पोचविण्याचे काम माने कुटुंबाने केले- आमदार विनय कोरे

धक्कादायक..! सासरच्या जाचाला कंटाळून राधानगरी, केळोशीत विवाहितेची आत्महत्या

राधानगरी ( प्रतिनिधी ) राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे वय 24 वर्षे हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे विवाहितेचा जाच करणाऱ्या पती,सासू,सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विवाहितेचा तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान तीचा जाच… Continue reading धक्कादायक..! सासरच्या जाचाला कंटाळून राधानगरी, केळोशीत विवाहितेची आत्महत्या

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करा; प्रशासनाने केले आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबतची माहिती घेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने घेतले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र… Continue reading ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करा; प्रशासनाने केले आवाहन

कोल्हापूरात 13 ऑक्टोबरला प्लेसमेंट ड्राईव्ह; मिळवा तातडीनं नोकरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दिली आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक… Continue reading कोल्हापूरात 13 ऑक्टोबरला प्लेसमेंट ड्राईव्ह; मिळवा तातडीनं नोकरी

कडबाकुट्टी मशिन अनुदानासह ZP च्या अनेक योजनांसाठी आजच अर्ज करा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2023-24 मध्ये… Continue reading कडबाकुट्टी मशिन अनुदानासह ZP च्या अनेक योजनांसाठी आजच अर्ज करा..!

‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळता सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक थांबवावी व तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अथवा 24 ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी… Continue reading ‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

धक्कादायक..! राशिवडे येथील प्रेमी युगलाचा पन्हाळा पावनगड येथे आत्महत्येचा प्रयत्न

पन्हाळा ( प्रतिनिधी ) पावनगड येथील तटाच्या कड्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये मुलगा वय वर्ष (२२) राहणार राशिवडे व मुलगी वय वर्ष (२१) राहणार राशिवडे येथील असून ते गंभीर जखमी झाले आहेत. चार च्या सुमारास पावनगड येथील दर्गा जवळच असलेल्या कड्यावरून जवळपास 30 फुटाच्या खोल तटावरून त्यांनी उडी घेतली. ही घटना… Continue reading धक्कादायक..! राशिवडे येथील प्रेमी युगलाचा पन्हाळा पावनगड येथे आत्महत्येचा प्रयत्न

Kolhapur Shahi Dasara 2023 : कोल्हापूरचा शाही दसरा ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरचा शाही दसरा हा राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने यावर्षी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, तसेच विविध स्पर्धां मध्ये खेळाडू व संबंधीतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारमार्फेत करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसा या महोत्सवाचे… Continue reading Kolhapur Shahi Dasara 2023 : कोल्हापूरचा शाही दसरा ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित

error: Content is protected !!