कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामास प्राधान्य देणे, नागरिकांना न्याय देण्याच काम करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे.


जिल्ह्यातील बरेच प्रश्न, विकास कामे मार्गी लागली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विकास हाच ध्यास ठेवून कार्य सुरु असून, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.


राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून प्र.क्र.६३ अंतर्गत थोरवत घर ते हवामहल मेनरोड पर्यंत गटर चॅनेल करण्याच्या कामास रु.३७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा शुभारंभ आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोणताही राजकीय हेतू न ठेवता सामाजिक हेतूने विकास कामे होणे गरजेचे आहे. त्याचमुळे मतदारसंघाचा भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास कामाचे पर्व सुरु करण्यात आले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्थानिकांमध्ये दोन गट पाडून राजकीय पोळी भाजण्याचाच प्रयत्न झाल्याने दक्षिण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. परंतु, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघाच्या विकासातून शहराचा विकास साध्य करण्याचे धोरण ठरविले आहे.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक सुरेश ढोणूक्ष, शिवसेना महिला आघाडी दक्षिण शहरप्रमुख अमरजा पाटील, युवती सेना शहर अधिकारी नम्रता भोसले, शहर समन्वयक संतोष घाटगे, जेष्ठ शिवसैनिक सुशील देसाई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, शिवसेना उपशहरप्रमुख टिंकू देशपांडे,

विभागप्रमुख क्षितीज जाधव, राजकुमार ओसवाल, उदय धारवाडे, नजीर पठाण, तानाजी गुडाळे, सागर जाधव,नारायण इंगोले, प्रवीण चव्हाण, रविंद्र नलवडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष घोडेराव, अश्विन शेळके, आकाश सांगावकर, दादू शिंदे आदी भागातील नागरिक, मंडळाचे संचालक सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.