कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना दलित पँथर सामाजिक संघटना व शिव उद्योग समूह यांनी आज जाहीर पाठिंबा व्यक्त केला. आम्ही पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार येत्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा देत असल्याची भूमिका दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले व शिव उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगीनहाळ यांनी आज स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि माहितीमध्ये वेगवेगळे गट, संघटना यांचे पदाधिकारी सामील होत लोकसभेसाठी आपली भूमिका स्पष्ट करत आहेत या पार्श्वभूमीवर आज दलित पॅंथर व शिव उद्योग समूह यांनी आपली भुमिका स्पष्ट करत खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत आपण एकत्र येत असल्याची भूमिका अस्पष्ट केली. यावेळी संजय मंडलिक यांचे चिरंजीव समरजीत मंडलिक यांनी यावेळी उपस्थित रहात याबाबत आभार व्यक्त केले.

दलित पॅंथर चे प्रदेशाध्यक्ष घनश्याम भोसले यांनी याबाबत स्पष्ट करताना म्हटले की. दलित पँथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील, यवतमाळ, संजय मंडलिक कोल्हापूर, धैर्यशील माने हातकणंगले, श्रीरंग बारणे मावळ, यासह अनेक उमेदवारांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देत असून याबाबतची आज घोषणा देखील आता केली आहे.

यापुढेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी दलित पॅंथर संघटनेमार्फत बिनच अर्थ जाहीर पाठिंबा दिला जाणारा असून कायमस्वरूपी गोरगरिबांचे कल्याण व्हावे दलित शेतकरी शेतमजुरी यांच्या विकासासाठी देशाच्या व महाराष्ट्राच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांच्या विचारामुळे एकनिष्ठ राहून लोकसभेसाठी उत्स्फूर्तपणे एकत्र येत आम्ही काम करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मिलींद चिटणीस, जयेश ओसवाल, गणेश चोंधे,सदानंद कडलक, रजीनीकांत वडगांवकर, चंद्रहार पाटील, गौतम इनामदार, रवी कांबळे, सात्ताप्पा कांबळे यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.