शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनाविण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन खास. धनंजय महाडीक यांनी केले. ते शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता महामेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील होते.

खा. महाडीक पुढे म्हणाले, भविष्यकाळात छोट्या छोट्या खेड्यांचे रूपांतर शहरात होणार असून खेडी विकसित होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी दहा करोड घरात गॅस दिलेत. तर ८० करोड जनतेला देशात मोफत धान्य वाटप सुरु आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असा गैरसमज पसरवण्यात येत आहे, मात्र संविधान बदलणार नाही. मोदी सरकारने आंबेडकरांचे पाच ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली आहेत असे असताना मोदी सरकार संविधान बदलेल का असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मेळाव्यास माजी आमदार सुरेश हळवणकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, माजी जि. प . सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक – निंबाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, माजी भाजपा जिल्हाप्रमुख हिंदुराव शेळके, इचलकरंजी नगरसेवक मिश्रीलाल जाजू,गुरुदत्त साखरचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल घाटगे, भारतीय युवा मोर्चाचे अरविंद माने, शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने,

भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, अन्वर जमादार, माजी नगराध्यक्षा नीता माने, अँड. सोनाली मगदूम, माधुरी ताकारी, छाया सूर्यवंशी, विजय झुटाळ, माधुरी ठाकरे, पुष्पाताई पाटील,तेजश्री पाटील, चांदसाहेब कुरणे, शिवसेना तालुकाप्रमुख उदय जुटाळ, तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. धैर्यशील माने शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांनी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते बरेच आहेत. पण शेतमजुरांसाठी राबणारा नेता यांनी मला पाठिंबा देण्यासाठी आजारी असून सुद्धा इथेपर्यंत आला त्यांचा मला अभिमान आहे.