दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटिल ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी दिंडनेर्ली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम राबवत दिंडनेर्ली ता. करवीर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी गादी वाफा तयार करणे, आळे पद्धतीने खते देणे, जैविक कीड नियंत्रण, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे , विविध पिकांची माहिती देणाऱ्या ॲपची माहिती दिली, पारंपरिक बियांचे महत्त्व, मूल्यवर्धित पदार्थांचे महत्त्व, चारा पिकांवर प्रक्रिया, तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या बाबतीत मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच मंगल कांबळे उपसरपंच श्री. राजाराम चौगुले व ग्रामसेवक श्री. काकासाहेब पाटील यांनी कृषीकन्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांनीही प्रतिसाद दिला. कृषीकन्या दिंडनेर्ली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्यातंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी कृषीमहाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. खरबड़े, समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. पी. भोलाणे आणि कृषी महाविद्यालयातील विविध तंज्ञांचे मार्गदर्शन लाभले तर या उपक्रमात कृषी महाविदयालयातील अंतिम विद्यार्थिनी वृषाली हासे, अंजली जाधव, स्नेहा लोखंडे, कोमल पाटील, धनश्री पाटील यांचा समावेश आहे. तसेच उपस्थिती. तानाजी पाटील राजाराम चौगले. बाळासो पाटील. युवराज परीट. सिद्धार्थ कांबळे. अण्णाप्पा शिंदे. आदी शेतकरी उपस्थित आहेत.