कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. याच्यामध्ये मालोजीरोज शाहू छत्रपती, इंडियन नॅशनल काँग्रेस यांचे नामनिर्देशनपत्रं अवैध ठरविण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे दि.20 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता सुरु करुन 11.30 वाजता पुर्ण करण्यात आली.


या छाननीमध्ये श्री. संदिप नामदेव शिंदे, बहुजन समाज पार्टी यांचे दोन अर्ज व मालोजीरोज शाहू छत्रपती, इंडियन नॅशनल काँग्रेस यांचा एक अर्ज अशी एकूण 2 उमेदवारांची 3 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली. एकूण 28 उमेदवारांनी 42 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छानणी अंती 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली व 2 उमेदवारांची 3 नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आली. सर्व नामनिर्देशपत्रांची छाननी करुन त्यावर निर्णय घेण्यात आला. मात्र मालोजीराजे शाहू छत्रपती अपक्ष हा अर्ज वैध ठरला आहे.