मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण ? ‘हे’ दोन चेहरे शर्यतीत

भोपाळ ( वृत्तसंस्था ) मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर भाजप नेतृत्वाकडे आहे. दरम्यान सट्ट्याचा बाजारही तापला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्यापासून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या माजी खासदारांच्या नावांचीही चर्चा आहे. यासोबतच बिगर आमदारांनाही संधी मिळू शकते, असे संकेत भाजप नेतृत्वाकडून मिळत आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार ? याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल.… Continue reading मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण ? ‘हे’ दोन चेहरे शर्यतीत

दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका

पुणे ( प्रतिनिधी ) भारतीय वारकरी मंडळ, पुणे तर्फे आज पुण्यनगरीत भव्य दिंडी सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दिंडीत सहभाग घेतला. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात अखंड परिसर दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत, विठुरायाच्या गजरात दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.… Continue reading दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका

संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, मी विरोधकांनाही सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी संसदेतील निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये. पराभवाचा राग काढण्याऐवजी सकारात्मक चर्चा व्हायला हवी, असे ही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या 9 वर्षांपासून पसरवलेले नकारात्मक विचार बदलले… Continue reading संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

भाजपला तीन राज्यत घवघवीत यश; चंद्रकांत पाटील त्यांच्यासह कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

पुणे ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाने आज चार पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील कोथरुड मंडळात विजयाचा जल्लोष साजरा… Continue reading भाजपला तीन राज्यत घवघवीत यश; चंद्रकांत पाटील त्यांच्यासह कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;खा. महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासह विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. मात्र खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील बस… Continue reading केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;खा. महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

भाजपच्या घवघवीत यशासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम आवश्यक- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यावतीने आज पुण्यात सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संवाद साधला. आज भाजपा विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपने विजयाचे तोरण बांधले आहे. यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. चंद्रकांत… Continue reading भाजपच्या घवघवीत यशासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम आवश्यक- चंद्रकांत पाटील

छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कमळ फुलले; काँग्रेसचा दारुण पराभव

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या 4-5 महिने उरले असताना छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजप एकतर्फी विजयी. भाजपने 3-1 असा विजय मिळवत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागले आहे. राजस्थानमध्ये गेल्या अनेक निवडणुकांपासून प्रत्येक वेळी सत्ता परिवर्तनाची परंपरा आहे, पण छत्तीसगड काँग्रेसच्या हातातून निसटणे हा जुन्या पक्षासाठी मोठा धक्का… Continue reading छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कमळ फुलले; काँग्रेसचा दारुण पराभव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

नागपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नागपूर येथे उपस्थित राहिले. नव्या पिढीने जाय सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मूजी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले. भारतीय मूल्यांना… Continue reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

उचगावात सतेज पाटील गटाला खिंडार; प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगावमध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह सतेज पाटील गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक… Continue reading उचगावात सतेज पाटील गटाला खिंडार; प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्नाटक जातनिहाय जनगणनेवर काँग्रेस गप्प का ? भाजप घेरण्याच्या तयारीत

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) बिहारमधील जातनिहाय जनगणनेच्या अहवालामुळे देशातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधक देशातील इतर राज्यांमध्ये जात जनगणना करण्याचे आश्वासन देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या यांच्या सरकारवर 2015 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाबाबत हल्ला होत आहे. कोंडीत अडकलेल्या सीएम सिद्धरामय्या यांच्या समोर यावर निर्णय घेणे… Continue reading कर्नाटक जातनिहाय जनगणनेवर काँग्रेस गप्प का ? भाजप घेरण्याच्या तयारीत