कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे दि.20 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता सुरु करुन 11.30 वाजता पुर्ण करण्यात आली.

या छाननीमध्ये श्री. संदिप नामदेव शिंदे, बहुजन समाज पार्टी यांचे दोन अर्ज व मालोजीरोज शाहू छत्रपती, इंडियन नॅशनल काँग्रेस यांचा एक अर्ज अशी एकूण 2 उमेदवारांची 3 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली. एकूण 28 उमेदवारांनी 42 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छानणी अंती 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली व 2 उमेदवारांची 3 नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आली. सर्व नामनिर्देशपत्रांची छाननी करुन त्यावर निर्णय घेण्यात आला.


छाननीमध्ये वैध ठरलेली नामनिर्देशनपत्र तपशील खालीलप्रमाणे…!

संजय सदाशिवराव मंडलिक (पक्ष – शिवसेना), सौ. रुपा प्रविण वायदंडे (पक्ष – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संजय भिकाजी मागाडे (पक्ष – अपक्ष, बहुजन समाज पार्टी), संदिप नामदेव शिंदे (पक्ष – बहुजन समाज पार्टी), शाहू शहाजी छत्रपती (पक्ष – इंडियन नॅशनल काँग्रेस, अपक्ष), संदिप भैरवनाथ कोगले (पक्ष –देश जनहित पार्टी, अपक्ष), नागनाथ पुंडलिक बेनके (पक्ष –अपक्ष), संदिप गुंडोपंत संकपाळ (पक्ष –अपक्ष), संतोष गणपती बिसुरे (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी), कृष्णा हणमंत देसाई (पक्ष –अपक्ष), सलीम नुरमंहमद बागवान (पक्ष –अपक्ष), सुनील नामदेव पाटील (पक्ष –नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), राहुल गोविंद लाड (पक्ष –अपक्ष), बसगोंडा तायगोंडा पाटील (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी), विरेंद्र संजय मंडलिक (पक्ष –अपक्ष), शशीभूषण जीवनराव देसाई (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा, अपक्ष), अरविंद भिवा माने (पक्ष –भारतीय राष्ट्रीय दल, अपक्ष), मुश्ताक अजीज मुल्ला (पक्ष –अपक्ष), बाजीराव नानासो खाडे (पक्ष –अपक्ष), माधुरी राजू जाधव (पक्ष –अपक्ष), ॲड. यश सुहास हेडगे-पाटील (पक्ष –अपक्ष), कृष्णाबाई दिपक चौगले (पक्ष –अपक्ष), मालोजीराजे शाहू छत्रपती (पक्ष –अपक्ष), सुभाष वैजू देसाई (पक्ष –अपक्ष), इरफान आबुतालिब चांद (पक्ष –अपक्ष), राजेंद्र बाळासो कोळी (पक्ष –अपक्ष), मंगेश जयसिंग पाटील (पक्ष –अपक्ष), कुदरतुल्ला आदम लतिफ (पक्ष –अपक्ष)

छाननी प्रक्रियेला निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनामध्ये सुरु असलेल्या छाननी प्रक्रिये दरम्यान उपस्थिती लावली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात नोडल अधिकाऱ्यांकडून त्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.