टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. या बैठकीमध्ये उत्स्फूर्तपणे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन उद्योजकांच्या पुढाकाराने स्टाफ व कामगारांनी ही मतदानामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे यासाठी एक पाऊल पुढे टाकून मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी औद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि याला सगळ्यांनी पाठिंबा दिला.

मतदान दिवशी सुट्टी म्हणून सर्व औद्योगिक संघटनांनी सोमवार दिनांक 6 मे 2024 या साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवून मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी औद्योगिक संघटनांच्या बैठकीमध्ये उपस्थित स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन चे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे व उपाध्यक्ष मोहन कुशिरे उपस्थित होते.