टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली.

मागील काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 37 अंशावर गेला असल्याने घामाने आणि उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारीही दिवसभर ऊन जोरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वाळवाच्या पावसाने टोप कासारवाडीसह परिसरात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा पसरला. पहिल्या पाऊस आल्याने बालचमूनी या पहिल्या पावसाचा आनंद लुटला. अजून जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत होती. तर या पावसामुळे सादळे – मादळे डोंगरातील रानमेवा असणारी काळी मैना म्हणजे करवंद पिकणार आहेत.