कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 7 मे रोजी 47- कोल्हापूर व 48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक म्हणून रोहित सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील सिंहगड कक्ष असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8799986822 असा असून निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी रोहित बांदिवडेकर आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9922955229 असा आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक खर्च निरीक्षक म्हणून चेतन आर.सी. यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील स्वाती कक्ष असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8421708895 असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी बी.व्ही. आजगेकर असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423857499 असा आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक म्हणून संदीप नांदुरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील भुदरगड कक्ष असा असून त्यांचा संपर्क क्र. 8468855153 असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रमोद माने असून त्यांचा संपर्क क्रमांक 8380083600 असा आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक खर्च निरीक्षक म्हणून श्रीमती हरिशा वेलंकी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील धनिष्ठा कक्ष असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 7276418739 असा असून निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्रीमती माधुरी परीट ह्या आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9420777524 असा आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक पोलीस निरीक्षक म्हणून विवेकानंद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील रेवती कक्ष असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 7219391971 असून निवडणुक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. भुजबळ आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9552777272 असा आहे.

47- कोल्हापूर निवडणुक निरीक्षक यांना शासकीय विश्रामगृह येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (रविवार वगळून) आहे. तर हातकणंगले निवडणुक खर्च निरीक्षक यांना शासकीय विश्रामगृह येथे भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 10 (रविवार वगळून) आहे. तसेच, निवडणुक निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यांना शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत (रविवार वगळून) आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हा निवडणुक अधिकारी समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.