चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

पुणे ( प्रतिनिधी ) कोथरुडमध्ये आमदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सामध्ये प्रशांत दामले यांच्या “सारखे काही तरी होतंय” हे सदाबहार विनोदी नाटक संकर्षण कऱ्हाडे यांचे तुफान गाजत असलेले “नियम व अटी लागू ” अशोक सराफ – निर्मिती सावंत यांच्या व्हॅक्युम क्लिनर सारख्या अनेक दर्जेदार नाट्य कलाकृतींचा आस्वाद कोथरूडकरांनी घेतला. “आमदार महोत्सवाचे हे तिसरे… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जरांगे यांची तोफ धडाडणार असून या सभेला सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मात्र आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधान आलं आहे.… Continue reading मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर… Continue reading अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मराठा आरक्षण : कोल्हापूर सभेची तयारी पुर्ण; दोन लाख ‘मराठा’ लावणार हजेरी – वसंतराव मुळीक

कोल्हापूर ( सुमित तांबेकर ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे रुग्णालयातून घरी परतताच उर्वरित महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर येथे सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सभेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती कोल्हापूर सकल मराठा समजाने दिली आहे. कोल्हापूर पोलिस प्रमुख महेंद्र पंडित या सभेबाबत माहिती… Continue reading मराठा आरक्षण : कोल्हापूर सभेची तयारी पुर्ण; दोन लाख ‘मराठा’ लावणार हजेरी – वसंतराव मुळीक

तेलंगणा निवडणुक काही दिवसांवर; आयकर विभागाची BRS आमदाराच्या घरावर छापेमारी

हैदराबाद ( वृत्तसंस्था ) तेलंगणाची विधानसभा निवडणूक काही दिवसांपुर्वी येऊन ठेपली आहे. त्यामुळे तेलंगणातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र राजधानी हैदराबादमध्ये आयकर विभागाने छापे सुरू आहेत. त्यामुळे तेलंगणामध्ये एकच खळबळ उडाली असून, या कारवाईवरुन राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या मिळालेल्यानुसार, आयकर विभाग हैदराबादमधील अनेक… Continue reading तेलंगणा निवडणुक काही दिवसांवर; आयकर विभागाची BRS आमदाराच्या घरावर छापेमारी

पुण्यातील अनोख्या भाऊबीजेचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांकडून कौतुक

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे शहरातील सर्व पक्षीय महिला नेत्यांनी आज अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. पुणे शहराला आगीसारख्या घटनांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचे औक्षण करून हा भाऊबीज सण साजरा करण्यात आला. भोई प्रतिष्ठान पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख… Continue reading पुण्यातील अनोख्या भाऊबीजेचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांकडून कौतुक

शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

मुंबई ( वृत्तसंस्था ) दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कास्ट सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार यांची ओबीसी कुणबी अशी वर्णी लागली आहे. त्यानंतर हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी शरद पवार यांचे शाळा सोडल्याचा दाखला सादर करताना त्यांच्या शाळा सोडल्याच्या… Continue reading शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

मराठ्यांचा बॅनर फाडणाऱ्यांचा कार्यक्रम निश्चित- मनोज जरांगे

जालना ( वृत्तसंस्था ) भोकरदन जिल्हा जालना येथील मराठा आरक्षणाखेरीज राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी याबाबत आक्रमक भुमिका घेत भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदारपुत्र संतोष दानवे यांच्या समर्थकांनी हे बोर्ड फाडल्याचे सांगितले. याबाबत बोलताना जरांगे एकेरीवर येत म्हणाले की,… Continue reading मराठ्यांचा बॅनर फाडणाऱ्यांचा कार्यक्रम निश्चित- मनोज जरांगे

कोल्हापुरात वातावरण तापणार..! एका व्यासपीठावर जरांगे तर दुसऱ्या व्यासपीठावर शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना पुन्हा एकदा साद घालत पुढील नियोजन स्पष्ट करणार आहेत. दरम्यान कोल्हापुरातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad… Continue reading कोल्हापुरात वातावरण तापणार..! एका व्यासपीठावर जरांगे तर दुसऱ्या व्यासपीठावर शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस

तालिबानला आवडले भारताने बांधलेले ‘हे’ बंदर म्हणाले व्यापारासाठी***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर अखुंद यांनी इराणला त्यांच्या चाबहार बंदरातून व्यापारासाठी प्रवेश प्रदान करण्याचे आवाहन केले. चाबहार बंदरामुळे अफगाणिस्तानला कमी वेळ आणि खर्चासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडून नवीन व्यापार भागीदारी स्थापित करणे शक्य होणार आहे. चाबहार बंदर भारताने विकसित केले आहे. भारताचा मध्य आशियाई देश आणि अफगाणिस्तान तसेच… Continue reading तालिबानला आवडले भारताने बांधलेले ‘हे’ बंदर म्हणाले व्यापारासाठी***

error: Content is protected !!