भुजबळांची घरवापसी ? ; शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर…

बारामती: लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे नाशिक मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक झाली. यासाठीही भुजबळ इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी न देता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने भुजबळ यांची संधी हुकली. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांबरोबर त्यांचं बिनसल्याची चर्चा सुरु असताना आता ते… Continue reading भुजबळांची घरवापसी ? ; शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर…

विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात मित्रपक्षाच्या भुमिकेने BJP ची डोकेदुखी वाढली

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये जागावाटपावरून चढाओढ सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की, त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी किमान 100 जागा लढवण्याची संधी मिळाली पाहिजे. शिवसेना महायुतीचा एक भाग आहे, ज्यात भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचाही समावेश आहे. राज्यात… Continue reading विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात मित्रपक्षाच्या भुमिकेने BJP ची डोकेदुखी वाढली

20 हजार कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची कारवाई, दिल्ली-मुंबई-नागपूरपर्यंत छापेमारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 ठिकाणांची झडती घेत छापेमारी केली. ही छापेमारी अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. यात 20,000 कोटींहून अधिक रुपयांची कथित बँक कर्ज फसवणूक केल्याचा आरोप आहे. अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर ईडीचा छापा टाकण्यात आला.… Continue reading 20 हजार कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची कारवाई, दिल्ली-मुंबई-नागपूरपर्यंत छापेमारी

छगन भुजबळांसह अजित पवार गटातील नेते पक्षांतर करतील ; रोहित पवारांनी सांगितली तारीख

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी अग्रही होते. परंतु भुजबळांना महायुतीने उमेदवारी दिली नाही आणि अजित पवार गटानेही… Continue reading छगन भुजबळांसह अजित पवार गटातील नेते पक्षांतर करतील ; रोहित पवारांनी सांगितली तारीख

शरद पवार चालणार वारीत; ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रमात सहभागी होणार

पुणे : पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत. यामध्ये साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते… Continue reading शरद पवार चालणार वारीत; ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रमात सहभागी होणार

…तर ‘त्या’ कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही : सुनिल तटकरे

शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला.आगामी विधानसभा जिंकण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असून मंगळवार (दि. 19) पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, तटकरे… Continue reading …तर ‘त्या’ कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही : सुनिल तटकरे

काही झालं तरी राज्य हातात घ्यायचय ; शरद पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

बारामती : लोकसभा निवडणुकीत मोठं यश संपादन केल्यानंतर शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शरद पवार मंगळवार (दि. 18) पासून तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसात ते संपूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. काल पासून शरद पवार गावोगावी भेट देत आहेत. निरावागज गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी मोठं… Continue reading काही झालं तरी राज्य हातात घ्यायचय ; शरद पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले ; पालकमंत्री मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कसबा सांगावमध्ये रस्ता खडीकरणाचा प्रारंभ कसबा सांगाव, ( प्रतिनिधी ) : जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. येथील टेंभी रस्ता ते सुळकुड रोड या दाईंगडे पानंदीतून… Continue reading जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले ; पालकमंत्री मुश्रीफ यांचे प्रतिपादन

छगन भुजबळ ठाकरे गटात येणार का ? काय म्हणाले संजय राऊत…?

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आज एका विधानाने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. संजय राऊतांनी आज विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय आहे. चोरीच्या पैशांनी सरकार माणसं विकत घेत आहेत, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. वारकऱ्यांना… Continue reading छगन भुजबळ ठाकरे गटात येणार का ? काय म्हणाले संजय राऊत…?

पाणीपुरी खाणं पडलं महागात..! जळगावमध्ये 80 जणांना विषबाधा

जळगाव – पाणीपुरी म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं ना..! पाणीपुरी हा पदार्थ जवळपास सगळ्यांना आवडतो. पाणीपुरी सर्व ठिकाणी पाहायला मिळते, फाईव्ह स्टार हॉटेल्स असो अथवा गल्लोगल्ली असलेले स्टोल्स असो सर्वत्र खायला मिळते, पण हीच पाणीपुरी तुमच्या जीवावर बेतू शकते असं म्हणल्यावर धक्का बसला ना..! पाणी पुरी खाल्याने 80 जणांना विषबाधा झाला आहे, यामध्ये लहान मुलांचा… Continue reading पाणीपुरी खाणं पडलं महागात..! जळगावमध्ये 80 जणांना विषबाधा

error: Content is protected !!