कोल्हापूर ( सुमित तांबेकर ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे रुग्णालयातून घरी परतताच उर्वरित महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर येथे सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सभेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती कोल्हापूर सकल मराठा समजाने दिली आहे.

कोल्हापूर पोलिस प्रमुख महेंद्र पंडित या सभेबाबत माहिती देताना म्हणाले की, ही सभा 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुरु होईल. या सभेच्या बंदोबस्तासाठी एकूण 40 पोलिस अधिकारी व 500 पोलिस कर्मचारी तैनात असतील अशी ही माहिती पंडित यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या सभेला किमान दोन लाख मराठा बांधव हजेरी लावतील हा अंदाज गृहीत धरत पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मनोज जरांगे हे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला वंदन करतील, व त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार असल्याची माहिती ही पोलिस प्रमुख यांनी दिली.

सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक याबाबत माहिती देताना म्हणाले की, या सभेचं नियोजन पुर्ण झालं असून, सभेसाठी मराठा बांधव शिस्तीने व नियोजनानुसार मोठ्या संख्येने उपस्थित राहतील तसेच आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई सुरुच राहील.