हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची, राहाण्याची व्यवस्था करण्याचे, पाण्यात अडकलेल्या… Continue reading हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस

धनुष्य बाण चिन्ह शिवसेनेकडेच राहणार : संजय राऊत

नाशिक (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे. ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे मिळाले आहेत. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. धनुष्य बाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे आणि शिवसेनेचेच राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात… Continue reading धनुष्य बाण चिन्ह शिवसेनेकडेच राहणार : संजय राऊत

नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची हत्या

नाशिक (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय धर्मगुरुंची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती असे या धर्मगुरुंचे नाव असून, ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखले जात होते. डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून,… Continue reading नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची हत्या

देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन घराबाहेर पडायचे : अमृता

नागपूर (वृत्तासंस्था) : राज्यात सत्तानाट्य घडण्यापूर्वी पडद्यामागून किंगमेकारची भूमिका साकारणारे देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या वेळी वेशांतर करुन घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते. मी त्यांना ‘तुमचे काय सुरू आहे’ असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे, असे गुपित अमृता फडणवीस यांनी… Continue reading देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन घराबाहेर पडायचे : अमृता

फडणवीसांनी उलगडले उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे ‘राज’

नागपूर (वृत्तसंस्था) : भाजप अध्यक्ष नड्डा, अमित शाह यांनी मी सरकारमध्ये सामिल व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद घेतले याचा मला कमीपणा वाटत नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला… Continue reading फडणवीसांनी उलगडले उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे ‘राज’

‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड…’

सोलापूर (प्रतिनिधी) : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या आपल्या अनोख्या भाषाशैलीमुळे संपूर्ण राज्यात परिचित झालेले सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा त्याच भाषेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला. जाधवांच्या विधानसभेतील भाषणाचा दाखला देत ‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड…काय ते वाकडं उभा राहणे… ओके आहे सगळं…’… Continue reading ‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड…’

नागपुरात फडणवीस यांचे जल्लोषी स्वागत

नागपूर (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (मंगळवारी) नागपूर येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आले आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. फडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात… Continue reading नागपुरात फडणवीस यांचे जल्लोषी स्वागत

उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास आता एनआयएकडे

अमरावती : व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या ही उदयपूर पॅटर्न प्रमाणेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शी तपासात उघड झाल्याले तब्बल ११ दिवसांनी पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या हत्येचा तपास आता एनआयए करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या… Continue reading उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास आता एनआयएकडे

मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग : ७ जणांचा मृत्यू  

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमधील ताडदेव येथील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज (शनिवार) सकाळी भीषण आग लागली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे १३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील… Continue reading मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग : ७ जणांचा मृत्यू  

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचा जीवनपरिचय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव) जि. सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. १९५५ मध्ये त्यांनी एम.ए (अर्थशास्त्र) आणि १९६२ मध्ये एल.एल.बी. पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.   १९५४ ते १९५७… Continue reading ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचा जीवनपरिचय

error: Content is protected !!