हैदराबाद ( वृत्तसंस्था ) तेलंगणाची विधानसभा निवडणूक काही दिवसांपुर्वी येऊन ठेपली आहे. त्यामुळे तेलंगणातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र राजधानी हैदराबादमध्ये आयकर विभागाने छापे सुरू आहेत. त्यामुळे तेलंगणामध्ये एकच खळबळ उडाली असून, या कारवाईवरुन राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या मिळालेल्यानुसार, आयकर विभाग हैदराबादमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. आयकर विभाग तेलंगणातील मिर्यालागुडा येथील बीआरएस उमेदवार आणि विद्यमान आमदार नल्लामोथू भास्कर राव यांच्यावर छापे टाकत आहे. त्यांचे कार्यालय, निवासस्थान आणि काही जवळच्या व्यक्तींवर छापे टाकले जात आहेत.

कोण आहेत नल्लामोथू भास्कर राव ?

नल्लामोथू भास्कर राव हे 1969 च्या पहिल्या तेलंगणा आंदोलनात विद्यार्थी संघ, एसआर आणि बीजीएनआर कॉलेजचे सरचिटणीस म्हणून सक्रिय सहभागी होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्यातील मिर्यालागुडा मतदारसंघातून विजय मिळवला. 2018 मध्ये सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून ते आमदार झाले आहेत.