मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वतःचे म्युझिक लेबल लाँच करण्याविषयी ची उत्सुकता व्यक्त करताना हृतिक मणी म्हणतात, “अनुष्का आणि मी बऱ्याच काळापासून यावर काम करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही हे लेबल लाँच करत आहोत.

हृतिकप्रमाणेच अनुष्का सोलवट ही म्युझिक लेबल लाँच करण्याबाबत उत्सुक आहे. ती म्हणते, “मला खरोखर आनंद आहे की, कित्येक महिन्यांच्या संघर्षानंतर, आम्ही आमचे स्वतःचे लेबल सुरू करू शकलो. मी आणि हृतिकने आमच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या मदतीने आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकले आहे !

बिग हिट मीडिया हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक उदयोन्मुख संगीत लेबल आहे आणि त्यात अनुभवी उद्योग व्यावसायिकांचा समावेश आहे. ज्यांना संगीताची आवड आहे आणि जे त्यांच्या कार्यात समर्पित आणि सर्जनशील आहेत. विविध भारतीय भाषांमधील भारतीय संस्कृतीच्या संस्कृतीची विविध रूपे दाखवणारी लोकप्रिय गाणी घेऊन ती उपलब्ध विविध समाज माध्यमातून भारतासोबतच जगातील विविध देशातील लोकांसमोर आणणे हे त्यांचे ध्येय आहे.