अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा

दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. निमित्त जरी वाढदिवसाचं असेल, तरी यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अजित… Continue reading अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा

राहूल गांधी असणार का लॉरेन्स बिश्नोईचं पुढचं टार्गेट..?

दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिध्दीकींच्या हत्येनंतर पोलिसांकडून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तापासाला वेग आला आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून देशातील बॉलीवूड स्टार्ससह देशातील राजकीय मंडळीनाही टार्गेट केले जाऊ शकते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओडिसा अभिनेता बुध्दादित्य मोहंती याने एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोईकडे काँग्रेस खासदार राहुल गांधींना पुढचे टार्गेट बनवण्याची मागणी केली आहे. मोहंतीच्या या… Continue reading राहूल गांधी असणार का लॉरेन्स बिश्नोईचं पुढचं टार्गेट..?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए वाढवण्याबाबत निर्णय घेतला असून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात येणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आताची ही डीए वाढ 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना डीए मूळ वेतनाच्या 53 टक्के मिळेल. केंद्र सरकारकडून केंद्राच्या… Continue reading सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

दिल्ली – इयत्ता दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची असल्यास त्या वर्षी त्यांची 75 टक्के उपस्थिती शाळेत बंधनकारण असणार आहे. जर विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी नसेल तर विद्यार्थ्याला परिक्षेत बसता येणार नाही. असा थेट आदेश केंद्राकडून देण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व… Continue reading दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

अबब …! 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात ‘एवढे’ पैसे

दिल्ली – सध्या सणावाराचे दिवस असून भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत , गृहिणींच्या टेंन्शन मध्ये वाढ झालीय . पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीत टोमॅटोला पाच रुपये किलोचाही दर मिळत नसल्याने उत्पादक चिंतेत पडले होते. मात्र, आता टोमॅटोमधील तेजी परतली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. टोमॅटोप्रमाणेच जवळपास सर्वच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.… Continue reading अबब …! 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात ‘एवढे’ पैसे

न्यायाधीशांची तुलना देवाशी करणे अयोग्य; सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले ?

कोलकाता ( वृत्तसंस्था ) भारताचे सरन्यायाधीश (CJI ) DY चंद्रचूड यांनी न्यायाधीशांची देवाशी तुलना करण्याची परंपरा धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. कोलकाता येथील नॅशनल ज्युडिशियल अकादमीच्या प्रादेशिक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. जेव्हा लोक न्यायालयाला न्यायाचे मंदिर म्हणतात तेव्हा मोठा धोका असतो. पक्षपातमुक्त न्यायाची भावना निर्माण करावी लागेल: CJI सरन्यायाधीश म्हणाले की, जेव्हा न्यायालय हे… Continue reading न्यायाधीशांची तुलना देवाशी करणे अयोग्य; सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले ?

राहुल गांधी चालणार पंढरीची वारी…

मुंबई : पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. वर्षभर वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी आस लावून बसलेले असतात. २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार आहेत. अशातच राहुल गांधी देखील वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पंढरीची वारी म्हणजे एकप्रकारे… Continue reading राहुल गांधी चालणार पंढरीची वारी…

कुणाच्या ताटातलं देऊ नका ; मराठा-ओबीसी संघर्षावर राऊतांचं वक्तव्य

मुंबई : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा समजल ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. सरकार समोर त्यांनी चार प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे… Continue reading कुणाच्या ताटातलं देऊ नका ; मराठा-ओबीसी संघर्षावर राऊतांचं वक्तव्य

20 हजार कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची कारवाई, दिल्ली-मुंबई-नागपूरपर्यंत छापेमारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 ठिकाणांची झडती घेत छापेमारी केली. ही छापेमारी अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. यात 20,000 कोटींहून अधिक रुपयांची कथित बँक कर्ज फसवणूक केल्याचा आरोप आहे. अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर ईडीचा छापा टाकण्यात आला.… Continue reading 20 हजार कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची कारवाई, दिल्ली-मुंबई-नागपूरपर्यंत छापेमारी

काही झालं तरी राज्य हातात घ्यायचय ; शरद पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

बारामती : लोकसभा निवडणुकीत मोठं यश संपादन केल्यानंतर शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शरद पवार मंगळवार (दि. 18) पासून तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसात ते संपूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. काल पासून शरद पवार गावोगावी भेट देत आहेत. निरावागज गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी मोठं… Continue reading काही झालं तरी राज्य हातात घ्यायचय ; शरद पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

error: Content is protected !!