सोमवारी ‘जनता दरबार’: नागरिकांनी तक्रारींसाठी उपस्थित रहावे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन अंतर्गत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज, निवेदन व अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे,… Continue reading सोमवारी ‘जनता दरबार’: नागरिकांनी तक्रारींसाठी उपस्थित रहावे

सावधान…! कोविड फैलावतोय; वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा– मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संबंधित विभागांना सुचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार कोविड –… Continue reading सावधान…! कोविड फैलावतोय; वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा– मंत्री हसन मुश्रीफ

श्री. रवळनाथाने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती द्यावी-ना. मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक निकाल नुकताच लागला असून, सभासदांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्याबाजूने कौल देत, साखर कारखाना निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रवळनाथ विकास आघाडीला 19 जागांवर विजय मिळवत आला आहे. तर विरोधी आघाडीला केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रवळनाथ विकास आघाडीचे… Continue reading श्री. रवळनाथाने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती द्यावी-ना. मुश्रीफ

कमिशन यायचं म्हणून काम थांबलंय का ? भर कार्यक्रमातच पालकमंत्री मनपा अधिकाऱ्यांवर भडकले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांची शहरातील निधी देऊनही रखडलेल्या विकास कामावरून चांगलीच खरडपट्टी केली. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला.” अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पुढे बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले महापालिकेच्या आयुक्त… Continue reading कमिशन यायचं म्हणून काम थांबलंय का ? भर कार्यक्रमातच पालकमंत्री मनपा अधिकाऱ्यांवर भडकले

धक्कादायक..! भरधाव ट्रकच्या धडकेत कोडोलीतील एक ठार

टोप ( प्रतिनिधी ) पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात शिये फाटा येथे धनराज हॉटेलसमोर आज सकाळी 8 वाजण्यासुमार झाला असून, या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे. या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय 47 रा वारणा कोडोली ता पन्हाळा… Continue reading धक्कादायक..! भरधाव ट्रकच्या धडकेत कोडोलीतील एक ठार

नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा; पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले.… Continue reading नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा; पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

जनता दरबार : तक्रार निराकरणासाठी लाभ घेण्याचं पालकमंत्र्यांनी केलं आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी लोकशाही दिन अंतर्गत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज,… Continue reading जनता दरबार : तक्रार निराकरणासाठी लाभ घेण्याचं पालकमंत्र्यांनी केलं आवाहन

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल ठरेल – पालकमंत्री

कागल ( प्रतिनिधी ) आयुष्यमान भारत ही देशातील गोरगरिबांना प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना राबविण्यात आणि योजनेची उद्दिष्टपुर्ती करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आणि कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ देशात अव्वल ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री… Continue reading आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल ठरेल – पालकमंत्री

पंचगंगा स्वच्छता, भुयारी, गटारी व रंकाळा संवर्धन निधीसाठी पालकमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रदूषित पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसह भुयारी गटारी प्रकल्प व रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. साधारणता साडेतीनशे कोटी निधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भातील प्रस्तावांच्या मंजुरीसाठी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे… Continue reading पंचगंगा स्वच्छता, भुयारी, गटारी व रंकाळा संवर्धन निधीसाठी पालकमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत. सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज… Continue reading यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

error: Content is protected !!