कागल ( प्रतिनिधी ) आज बुधवार दि. 17 म्हणजेच प्रभू श्री. रामनवमी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्री. रामचंद्रांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. खर्डेकर चौकातील प्रभू श्री. राममंदिरात मोठ्या उत्साहात ही आरती झाली.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, प्रभू श्री. रामनवमी म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव जणू. पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. दरवर्षीच प्रभू श्री. रामनवमी दिवशी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक आणि विधायक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आजही सबंध जिल्हाभर कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. यातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद हीच पालकमंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांची खरी पुण्याई आहे.

यावेळी तात्यासाहेब पाटील, प्रताप उर्फ भैया बाबा माने, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नवल बोते, अजित कांबळे, विवेक लोटे, सतीश गाडीवडर, प्रवीण काळबर, विजयसिंह पाटील, कृष्णात पाटील, संजय चितारी, अमित पिष्टे, पंकज खलीफ, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, अजित निंबाळकर, संग्राम लाड, संग्राम गुरव, गणेश कांबळे, सुनील कदम, बच्चन कांबळे, अशोक जकाते, भगवान कांबळे, पंकज घुले, सचिन नलवडे, गंगाराम शेवडे, सुहास सनगर, के. पी. पिष्टे, शानूर पखाली, शशिकांत नाईक, अशोक वड्ड, अमोल डूईफुडे, लखन पालकर, संतोष रजपूत, तानाजी मकवाने तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कर्मचारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.