कागल ( प्रतिनिधी ) जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कागल पोलिस आता अॅक्शन मोडमध्ये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले असल्याची नामदार हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आलं. यावर नामदार मुश्रीफ यांचे काही फोटो व इतर मजकूर फोटो आणि व्हिडिओची केली कॉपी प्रसिद्ध केल्याचे लक्षात आलं. यावरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कागल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यानंतर कागल पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा 2000 अंतर्गत कलम 66 क व कलम 43 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी लवकरच संशयितांना अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.