कागल ( प्रतिनिधी ) कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते. एकात्मिक बाल विकास प्रकल्प -कागल अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या नूतन मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसा॓ची नावे अशी, मिनी अंगणवाडी सेविका: मीनाक्षी रामचंद्र शिंदे – माद्याळ, शितल सागर खोत- व्हन्नूर, प्रियांका रामचंद्र बाबर-बामणी.

मदतनीस: स्नेहल प्रमोद कांबळे- वंदूर, मुस्कान चांदसो शिकलगार -वंदूर, दीपिका कृष्णात कांबळे- सोनगे, अश्विनी महेश सावंत -यमगे, ज्योती सागर कांबळे- अलाबाद, सुजाता अंकुश चोपडे- हमीवाडा, शितल वीरेंद्र खवरे- माद्याळ, मनीषा सागर पाटील -सोनाळी, अश्विनी सुहास कांबळे- सेनापती कापशी.