उत्तुर ( प्रतिनिधी ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल उत्तुर ता. आजरा येथे सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला.

हा सकल मराठा समाजाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह उपस्थितांनीही “एक मराठा- लाख मराठा…..” अशा जोरदार घोषणा दिल्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजवरच्या मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये वारंवार झालेल्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होऊन मराठा समाजाची मागणी लावून धरली आणि मराठा समाजाच्या मागणीच्या पाठीशी राहिले. याबद्दल हा सत्कार झाला.

यावेळी सुनिल दिवटे-वडकशिवाले, रामदास आजगेकर-पेंढारवाडी, संजय येजरे-हालेवाडी, मश्चिंद्र कडगावकर- कर्पेवाडी, सुधीर सावंत-उत्तूर, आनंदा घाटगे-मडिलगे, संजय गाडे- भादवण, शिवाजी भोसले-धामणे आदी उपस्थित होते.