अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी कृष्णात खोत यांच्या “रिंगाण” या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहणार नाही– चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) राज्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) प्रचार, प्रसिद्धी आणि अंमलबजावणीत राज्य मागे राहणार नसल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत आज दिली. सभागृह सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देत असताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या… Continue reading कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहणार नाही– चंद्रकांत पाटील

मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल नूतनीकरण करून खेळांडूना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार- चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विलास पोतनीस यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. यावेळी पाटील यांनी… Continue reading मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल नूतनीकरण करून खेळांडूना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार- चंद्रकांत पाटील

यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापणार–  मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या रोजगार निर्मितीत यंत्रमागधारकांचे मोठे योगदान आहे. यानुषंगाने राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट स्थापन केला जाणार असल्याची घोषणा आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. यात भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजीमधील लोकप्रतिनिधी आणि यंत्रमानधारकांना समाविष्ट करून अभ्यास गट तयार केला जाईल. यंत्रमाग व्यवसायाच्या वृद्धीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून… Continue reading यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापणार–  मंत्री चंद्रकांत पाटील

जनहित करताना लोकप्रतिनिधींना नियमांची इत्यंभूत माहिती आवश्यक- मंत्री चंद्रकांत पाटील 

नागपूर ( प्रतिनिधी ) आज नागपूर येथे ‘लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदार संघाविषयी कर्तव्ये आणि विकास कामांचे नियोजन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या 50 व्या संसदीय अभ्यास वर्गास उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील प्रश्नांबरोबरच… Continue reading जनहित करताना लोकप्रतिनिधींना नियमांची इत्यंभूत माहिती आवश्यक- मंत्री चंद्रकांत पाटील 

“लेक माझी लाडकी” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘लेक माझी लाडकी’योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने किती निधीची तरतूद केली ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात ‘लेक माझी लाडकी’च्या अंमलबजावणीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मुलींच्या सक्षमीकरणाकरीता लेक माझी लाडकी या नवीन योजनेची घोषणा करण्यात… Continue reading “लेक माझी लाडकी” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-आमदार सतेज पाटील

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 50 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

नागपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “50 वा संसदीय अभ्यासवर्ग” सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूरमधील विधानभवनात झाले. राज्यातील 12 विद्यापीठातील सुमारे 100 विद्यार्थी व अधिव्याख्याते सहभागी होणार आहेत. विधानमंडळाच्या यु -ट्यूब चॅनल वरुन तसेच माहिती… Continue reading राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 50 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चहापान कार्यक्रमास रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री… Continue reading अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा- संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) आजपासून नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाला. संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूरमधील विधानभवनातील दालनात गणेश वंदन केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा इतर महत्वपूर्ण व्यक्तींच्या दालनात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय कार्य मंत्री या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,… Continue reading जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा- संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

error: Content is protected !!